ट्रॅक्टर रॅली दरम्यान शेतकरी आक्रमक; पोलिसांकडून शेतकऱ्यांवर लाठीचार्ज, अश्रूधुराचा मारा !

नवी दिल्ली, दि. २६ – प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज राजपथावर भारताच्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन अवघ्या जगाला झाले. जवानांच्या परेडनंतर लाखो आंदोलक शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली सुरु झाली आहे. यावेळी देशाच्या राजधानीत ‘जय जवान, जय किसान’चा नारा घुमणार होता. दिल्लीत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लष्करी छावणीचे रूप आले होते.

शेतकऱ्यांची ही ट्रॅक्टर रॅली सिंघू-टिकरी आणि गाझीपूर सीमेवरून हजारो ट्रॅक्टर्स घेऊन शेतकरी राजधानी दिल्लीत प्रवेश केला आहे. ट्रॅक्टरवर राष्ट्रध्वज तिरंगा आहे. असेल तसेच देशभक्तीपर गीते लावण्यात येणार आहेत. ट्रॅक्टरवर शेतकरी महिला असणार आहेत. या ट्रॅक्टर परेडपुढे शेतकरी असतील. राजपथावर प्रजासत्ताकदिनाचा मुख्य सोहळा झाल्यानंतर दिल्लीत ट्रॅक्टर परेड निघाली. सुमारे शंभर किलोमीटरची ही परेड असेल. ही परेड शांततापूर्ण असेल, असे आवाहन शेतकरी नेत्यांनी केले होते.

मात्र या दरम्यान दिल्लीच्या सीमांवर शेतकरी नियोजित वेळेच्या आधी पोःआचाले त्यामुळे आक्रमक शेतकरी आणि पोलीस यांच्यात वातावरण चिघळलेले दिसून आले. या आंदोलकांना पोलिसांनी रोखल्यानंतर शेतकर्यांनी सिंधू, टीकरी, नोएडा, या तिन्ही सीमांवर शेतकऱ्यांनी बॅरीकेट्स तोडून प्रवेश केला यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांना विरोध केल्या नंतर त्यमुळे पोलिसांना शेतकऱ्यांवर लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा मारा करावा लागला. यावेळी शेतकऱ्यांनी तलवारी घेऊन पोलिसांचा पाठलाग सुरु केला. त्यामुळे शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे. आज आंदोलनाचा मुख्य मुद्द्दा बाजूला सारला जात असल्याच दिसून येत आहे.

मोदी सरकारने मनमानी पद्धतीने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. दिल्लीच्या सीमांवर लाखो शेतकरी दोन महिन्याहून अधिक दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत ठाण मांडून बसले आहेत. कृषी कायदे रद्द केल्याशिवाय मागे हटणार नाही, यावर शेतककऱ्यांची ठाम भूमिका आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: