मोदी सरकारला कष्टकऱ्यांबद्दल कवडीची आस्था नाही – शरद पवार

मुंबई, दि . 25 – मोदी सरकारला कष्टकऱ्यांबद्दल कवडीची आस्था नाही. कायदे करताना चर्चा होऊन एकमताने मंजूर केले जातात. मात्र मोदी सरकारने घटनेचा विचार न करता बहुमताच्या जोरावर कायदा केला. विश्वासात न घेता कायदा केला तर जनता सत्ता उलथवून लावल्याशिवाय राहत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मुंबईत काढयात आला. या मोर्चायसाठी आझाद मैदानावर राज्यभरातील हजारोंच्या संख्येने शेतकरी जमले आहेत. शेतकऱ्यांना संबोधित करत असताना शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली. यावेळी किसान मोर्चाचे अजित नवाळे, कॉंग्रेस मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप, अशोक ढवळे, मेधा पाटकर आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, देशात वेगवेगळ्या राज्यातून शेतकरी दिल्लीत प्रचंड अभूतपूर्व शांततामय आंदोलन करत आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे, पण त्यांना शेतकरी कष्टकरी किंमत नाही. 60 दिवस झाले उन्हातान्हात थंडी वाऱ्याचा विचार न करता शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकरी रस्त्यावर बसला आहे. पण पंतप्रधान मोदी यांनी साधी चौकशी केली का? पंजाबचा शेतकरी म्हणजे पाकिस्तानचा आहे का? साधा शेतकरी आहे तो, त्याची विचारपुस सुद्धा करावीशी वाटली नाही का? असा संतप्त सवाल शरद पवार यांनी यावेळी विचारला .

दरम्यान, राज्यपाल हे आज मुंबईत नाहीत ते गोव्याला गेले आहेत. त्यांना राज्यातील शेतकऱ्यांपेक्षा इतर गोष्टी महत्वाच्या वाटतात, असेही पवार म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: