क्रिकेटपटू महमद अझरुद्दीन यांची ‘आझम कॅम्पस’ ला भेट 

पुणे : भारतीय क्रिकेट संघाचे  माजी कप्तान  महमद अझरुद्दीन यांनी नुकतीच  ‘आझम कॅम्पस’ ला भेट देऊन क्रीडाविषयक प्रगतीचे कौतुक केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार,उपाध्यक्ष आबेदा इनामदार,एस ए इनामदार,इरफान शेख,आझम स्पोर्ट्स अकादमीचे गुलझार शेख यांनी स्वागत केले.अझरुद्दीन यांनी कॅम्पस मधील क्रिकेट मैदान आणि पॅव्हेलियनची पाहणी केली. आझम स्पोर्ट्स अकादमी च्या क्रीडापटू विद्यार्थ्यांशी अझरुद्दीन यांनी संवाद साधला. या भेटीदरम्यान अझरुद्दीन समवेत रियाझ बागवान हे उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: