कशीश जैनने पटकाविले विजेतेपद – १२ वी खुली बुद्धीबळ स्पर्धा

पुणे :  फिडे मास्टर कशीश जैन याने विनायक नवयुग मित्र मंडळ आणि हिंद शक्ती सोशल फाउंडेशन आयोजित १२व्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत १२ ते १८ वयोगटात सात गुणांसह विजेतेपद पटकावले.
भांडारकर रस्त्यावरील मिलेनियम टॉवर येथे ही स्पर्धा झाली. या स्पर्धेतील  १२ ते १८ वयोगटाचा पारितोषिक वितरण समारंभ इंटरनॅशनल मास्टर जयंत गोखले, आॅर्बीटर राजेंद्र शिदोरे, दत्तात्रय खाडे, वर्धमान पुंगलिया यांच्या हस्ते झाले. यावेळी विनिता श्रोत्री, दिप्ती शिदोरे, सुनील पांडे, दत्तात्रय फंड, अभिजीत मोडक, वरुण जकातदार, रमेश गिरमकर, दिनेश आंबुरे, योगेश जोगळेकर उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्यांना करंडक, रोख पारितोषिक, आणि पदके देण्यात आली. 

कशीश जैनने सातही फेºयांमध्ये बाजी मारली. त्याने सातव्या आणि अंतिमच्या फेरीत शार्दूल गोडबोलेवर विजय मिळवला. अनुज दांडेकर सहा गुणांसह दुसºया, तर ओम लामकाणे साडेपाच गुणांसह तिसºया क्रमांकावर राहिला. शार्दूल गोडबोले, केवल निर्गुण, प्रथमेश शेरला प्रत्येकी पाच गुणांसह अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर राहिले. 
स्पर्धेत १८ वर्षांखालील  गटात मेहफूज बशीर पठाण (५ गुण) तर १६ वर्षांखालील – मिहीर सरवदे (४.५ गुण) आणि १४ वर्षांखालील – केरा डागरिया (५ गुण) यांनी वैयक्तिक विजेतेपदाचा मान मिळविला.

सातव्या फेरीचे काही निकाल –  कशीश जैन (७) वि. वि. शार्दूल गोडबोले (५), अनुज दांडेकर (६) वि. वि. सौरभ म्हामणे (४.५), ओम लामकाणे (५.५) वि. वि. अक्षय बोरगावकर (४.५),  श्रावणी उंडळे (४) पराभूत वि. केवळ निर्गुण (५), केरा डागरिया (५) वि. वि. अनया रॉय (४), ओजस देवशतवार (४) पराभूत वि. प्रथमेश शेरला (५), मेहफूज बशीर पठाण (५) वि. वि. नील काकडे (४), अभिजय दंडवते (३.५) पराभूत वि. मिहीर सरवदे (४.५), प्रथमेश कशीद (३.५) पराभूत वि. आर्यन शहा (४.५), अदिती कायल (४.५) वि. वि. धनश्री खैरमोडे (३.५)

Leave a Reply

%d bloggers like this: