कोठिया, वर्ष्ने, शेख यांना सुश्रृत जीवनगौरव पुरस्कार जाहीर

पुणे : डॉ. पाईल्स क्लिनिकच्या वतीने सुश्रृत पुरस्कार प्रदान सोहळ््याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दिनांक २७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता कात्रज कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन टेम्पल येथे पुरस्कार वितरण सोहळ््याचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. मधुभाई कोठिया (मुंबई), डॉ. सुभाष वर्ष्ने (अमरावती), डॉ. मीना शेख (पुणे) यांना सुश्रृत जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती डॉ. पाईल्स क्लिनिकचे डॉ. कुणाल कामठे यांनी दिली. 
संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. यावेळी डॉ. शिवकुमार गोरे, डॉ. मिलिंद भोई, आमदार चेतन तुपे, योगेश टिळेकर, जालिंदर कामठे, अ‍ॅड. प्रताप परदेशी, रंजना टिळेकर, संगिता ठोसर उपस्थित राहणार आहेत. 
कार्यक्रमात डॉ. कुलदीप कोहली (मुंबई), डॉ. गौरी बोरकर (मुंबई) यांना आयुर्वेद आयकॉन तर डॉ. राजेश गुप्ता (सावंतवाडी), डॉ. महफुझूल्लाह काद्री (उस्मानाबाद) यांना सुश्रृत रत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. प्रोक्टोलॉजीमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल डॉ. व्यंकट भारद्वाज (हैद्राबाद), डॉ. प्रविण सहावे (नागपूर) यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: