‘मनो-नियंत्रण आणि दृष्टिकोन बदल’ कार्यशाळेचे आयोजन

पुणे – आजच्या या कठीण परिस्थितीमध्ये प्रत्येक व्यक्ती हि कमी-अधिक प्रमाणात मानसिक दृष्ट्या तणावात आहे. जीवनात अमुलाग्र बदल घडवण्यासाठी रोजच्या जगण्यामध्ये दृष्टिकोनात बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. चिंता, भिती आणि ताण-तणाव तसेच आत्मविश्वासाच्या अभावाने येणारे नैराश्य, उदासीनता, नकारात्मकता, आत्महत्येचे विचार हे केवळ दोन दिवसाच्या शिबिरात दूर करण्यासाठी संकल्प मानव संसाधन आणि विकास संस्थेतर्फे ‘मनो-नियंत्रण आणि दृष्टिकोन बदल’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ. पी. एन. कदम यांचे मार्गदर्शन या कार्यशाळेमध्ये लाभणार आहे. 30 आणि 31 जानेवारी रोजी जंगली महाराज रोड येथील तरवडे क्लार्क्स इन मध्ये हि दोन दिवसीय कार्यशाळा होणार असल्याची माहिती ‘संकल्प’च्या संचालिका डॉ. अपूर्वा अहिरराव यांनी दिली.

प्रयोगातून आणि खेळातून शिक्षण, मनासारखा क्लिष्ट विषय शास्त्रीय दृष्टिकोनातून शिकवत प्रत्येकाला समजेल अशा सोप्या आणि सुलभ भाषेत हसत-खेळत डॉ. कदम यांची शिकवण्याची पद्धत हे कार्यशाळेचे वैशिष्ट्य आहे. केवळ निवडक लोकांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दोन दिवसातील पंधरा तासांमध्ये मन म्हणजे नेमके काय? तसेच मानवी वर्तणूकीचा थक्क करणाऱ्या प्रयोगापर्यंत वेगळा अनुभव या कार्यशाळेद्वारे मिळणार आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी संपर्क : 7774060264 / 7720901234

Leave a Reply

%d bloggers like this: