भारतभर होणार सर्वात मोठे विनामूल्य मूळव्याध तपासणी शिबिर-डॉ.पाईल्स क्लिनिकच्या वतीने आयोजन

पुणे : डॉ. पाईल्स क्लिनिकच्या वतीने पाईल्स फ्री इंडिया मोहिमेअंतर्गत सर्वात मोठ्या विनामूल्य मूळव्याध तपासणी शिबिराचे आयोजन संपूर्ण भारतभर करण्यात आले आहे. भारतातील विविध भागातील ३२७ आयुष डॉक्टर या उपक्रमात सहभागी झाले आहेत. सोमवार दिनांक २५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत हे तपासणी शिबिर होणार आहे. या शिबिराची इंटरनॅशनल बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली जाणार आहे, अशी माहिती डॉ. कुणाल कामठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
पत्रकार परिषदेला डॉ.शर्मिला कामठे, डॉ. सुरेश मुरुड, डॉ. सीमा पाटोळे उपस्थित होते. 

डॉ. पाईल्स क्लिनीक यांच्या वतीने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून निरोग स्ट्रीट, हेम्प स्ट्रीट यांच्या सहकार्याने उपक्रम राबविण्यात येणार आहे. देशातील विविध ठिकाणी कॅम्प, क्लिनिक, इन्स्टिट्यूट, हॉस्पिटल तसेच आयुर्वेदीक कॉलेजमध्ये मूळव्याध तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 
डॉ. कुणाल कामठे, पॅन इंडियाच्या माध्यमातून भारतभर विनामूल्य मूळव्याध तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातील आयुष डॉक्टर एकाच दिवशी एकाच वेळी मूळव्याध रुग्णांची विनामूल्य तपासणी करणार आहेत. तब्बल ५ हजारपेक्षा अधिक रुग्णांना मोफत सल्ला आणि तपासणी यामधून साध्य होणार आहे. 
या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही मूळव्याधाविषयी जनजागृती करणार आहोत. आजही आपल्याकडे मूळव्याधाविषयी अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे अनेक रुग्ण उपचारासाठी डॉक्टर पर्यंत पोहोचत नाहीत. भिती, लज्जा किंवा योग्य डॉक्टरविषयी माहिती नसणे अशा अनेक गोष्टी याला कारणीभूत आहेत. मूळव्याध हा सर्वसामान्य आजार असून तो जीवनशैलीशी निगडीत आहे. योग्य उपचार आणि औषधाने तो पुर्णपणे बरा होतो.

Leave a Reply

%d bloggers like this: