पाच लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? सीरम आगीची CBI चौकशी करा – संभाजी ब्रिगेड

पुणे, दि. 21 – महाराष्ट्रात वीस दिवसातील जळून होरपळून मरण्याची ही दुसरी मोठी घटना आहे. ज्या प्रकरणाकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागलेले आहे. सिरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग लावली की लागली हा संशोधन तपासण्याचा विषय आहे. परंतु देशभरातून ज्या मोठ्या संशोधन संस्थेकडे आशेने लोकांचं लक्ष लागलेला आहे अशा ‘सिरम इन्स्टिट्यूट’ मध्ये अचानक आग लागणे ही धोक्याची घंटा आहे. नक्कीच हा हलगर्जीपणा किंवा संशय निर्माण करणारी घटना आहे. मात्र याकडे पोलीस प्रशासन अथवा इतर यंत्रणांनी गंभीर पणे घेतलेलं दिसत नाही. कारण घडलेल्या घटनेच्या दोन तासांमध्ये प्रत्येकांचे स्टेटमेंट वेगळेवेगळे आलेले आहेत. यामुळ या प्रकरणाची CBI चौकशी करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे.

मा. पोलीस आयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करतात, एक तासानी मा. मुख्यमंत्री महाराष्ट्राला या घटनेबद्दल संबोधित करतात… सिरम इन्स्टिट्यूट मधील स्टाफमधील श्री. प्रधान नावाचा व्यक्ती कुठलीही जीवित हानी झाली नाही असं सांगतात…! तोपर्यंत अचानक ५ वाजता ५ लोक गेल्याची (मृत्यूची) बातमी येते… हा संशय निर्माण करणारी घटना आहे. केंद्र सरकारने या आगीची गंभीरपणे दखल घेतल्या नंतर सुद्धा पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि इतर सगळी यंत्रणा चुकीची माहिती का सरकारपर्यंत देत होते… हेही ढिसाळ कारभाराचे लक्षण आहे. कारण अग्नीशमन दलाचे लोक संबंधित आग भिजवल्यानंतर हॉलमध्ये जाऊन पोहोचले असताना आणि खिडकीची काच तोडत असताना जर सर्व TV चैनल वरून लाईव्ह बातम्या दाखवल्या जात असतील आणि जीवितहानी झालेली नाही असे सांगितल्यानंतर सुद्धा एका तासाने ५ लोकांच्या मृत्यूची बातमी प्रसिद्ध होते हे ही संशयास्पद आहे. संपूर्ण प्रकरणाची CBI चौकशी झाली पाहिजे.

पाच लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण….?

पाच लोकांच्या मृत्यूला ढिसाळ प्रशासन आणि सुस्त यंत्रणा कारणीभूत असावी. कारण सगळ्यांचे ट्विटर किंवा फेसबुक आणि TV चैनल वर प्रमुख अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती ह्या सरासर खोट्या आणि मुख्यमंत्री, केंद्रीय पथक या सगळ्यांना दिशाभूल करणाऱ्या आहेत. एक तर खूप वेळ माहिती लपवली किंवा खरी माहिती समोर येऊ दिली नाही अशी शंका निर्माण होते.

महाराष्ट्रात कामात कसूर केल्याबद्दल वारंवार आग लागण्याच्या किंवा जळून होरपळून मरण्याच्या घटना घडत आहेत. ‘वीस दिवसातील ही दुसरी घटना आहे.’ म्हणून संपूर्ण प्रकाराची सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: