लीला पुनावाला फाउंडेशन कडून ४७७ शालेय मुलींना शिष्यवृत्ती प्रदान
पुणे – साथीच्या आजारामुळे (कोवीड १९) २०२० हे सर्वांसाठी एक आव्हानात्मक वर्ष ठरले आहे, आश्या स्थितीमध्ये देखील लीला पुनावाला फाउंडेशन (एलपीएफ) ने आपली मदतीची परंपरा कायम ठेवत आर्थीक रित्या दुर्बल पार्श्वभूमी असलेल्या ४७७ मुलींना शैक्षणिक दृष्ट्या पाठिंबा दिला आहे.
आपल्या 25 वर्षांच्या इतिहासात आता प्रथमच एलपीएफने वेगळ्या पद्धतीने शालेय प्रकल्पांसाठी शिष्यवृत्ती प्रदान केली आहे. सर्वत्र साथीच्या आजारामुळे एकत्रित येण्यासंबंधीचे प्रतिबंध लक्षात घेऊन ग्रामीण भागात गावडेवाडी, कामशेत व पुणे शहरात चार दिवसीय शिष्यवृत्ती प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम घेण्यात आला. यात मुलींना शिष्यवृत्तीची प्रमाणपत्रे देण्यात आली. मुलींना व त्यांच्या पालकांना या विशेष प्रसंगी दुपारच्या जेवणाच्या ऐवजी स्विट्स बॉक्स देण्यात आले.
पुण्यातील कार्यक्रमात बोलताना – सेको टूल्सच्या सुपर्णा रे म्हणाल्या, “आज शिक्षणासाठी बर्याच मुली पुढे आल्या आहेत आणि शिक्षण घेत आहेत याचा मला अभिमान वाटतो. मी पालकांना त्यांच्या मुलींना पाठिंबा देण्याचे आव्हान करते , त्यांनी आपल्या मुलींना अधिक शिक्षणासाठी सक्षम बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करवा अशी मी पालकांना विनंती करते. ”
फिरोज पुनावाला (संस्थापक ट्रस्टी एलपीएफ) म्हणाले – “२५ वर्षात आणि नंतरच्या अनेक प्रकल्पांमध्ये, टूमारो-टूगेदर हा शालेय शिष्यवृत्ती प्रकल्प मला मनापासुन प्रिय आहे, लहान मुलींना आज सातव्या इयत्तेपासून शिकताना पाहणे आणि त्यांना भविष्यातील स्वतंत्र महिलांच्या रुपात पाहणे खरोखर आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. आणि होणारे हे परिवर्तन अविश्वसनीय आहे. ” साथीच्या आजारामुळे विलंबित झालेली पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठीची शिष्यवृत्ती लवकरच जाहीर केली जाईल.