सीरम इन्स्टिट्यूटकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाखांची मदत

पुणे – सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांच्या कुटुंबीयांना सीरम इन्स्टिट्यूटकडून आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. मृतांपैकी दोन जण पुण्यातील असून अन्य दोन जण उत्तर प्रदेश व एकजण बिहारमधील आहे. हे सर्वजण कंत्राटी मजूर असल्याची माहिती समोर आली आहे.

“आज SII साठी अत्यंत दु:खद दिवस आहे. आम्हाला अतिशय दुःख झाले आहे आणि मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. नियमानुसार या कुटंबांनी जी मदत मिळायची आहे ती मिळेलच, मात्र त्या व्यतिरिक्त आम्ही प्रत्येक कुटुंबास २५ लाखांची मदत देत आहोत.” असं सायरस पुनावाला यांनी जाहीर केलं आहे.

सीरम इन्स्टिट्यूटमधील अग्नितांडवात, प्रतिक पाष्टे – डेक्कन पुणे, महेंद्र इंगळे – पुणे, रमाशंकर हरिजन – उत्तर प्रदेश, बिपीन सरोज – उत्तर प्रदेश, सुशीलकुमार पांडे – बिहार या पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: