Thursday, June 18, 2026
MAHARASHTRAPUNE

मातंग समाजाच्या आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन

पुणे, दि. 21 — मातंग समाजाचे स्वतंत्र आरक्षण ,अण्णाभाऊ साठे महामंडळ सुरू करावे, यासह इतर
मागण्यासाठी दलित महासंघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले. दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.मच्छिंद्र सकटे यांनी या आंदोलनाचे नेतृत्त्व केले.

या वेळी प्रा. .डॉ.मच्छिंद्र सकटे म्हणाले की अलीकडे महाराष्ट्रात मराठा आरक्षण ,ओबीसी आरक्षण ,धनगर आरक्षण याबाबत आघाडी सरकार विशेष भूमिका घेताना दिसत आहे. परंतु मातंग समाजाच्या आरक्षणाकडे हे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा गंभीर आरोप सकटे यांनी केला आहे .त्यामुळे हे सरकार मातंग समाजाच्या बाबतीत विरोधी भूमिका घेत आहे त्यामुळेच याचा निषेध करण्यासाठी आज पुण्यात आक्रोश आंदोलन करण्यात येत आहे .आमच्या मागण्या लवकर मान्य नाही केल्यास दलित महासंघ राज्यभर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सकटे यांनी यावेळी दिला.

या आंदोलनात मातंग समाजाच्या आरक्षणासह बार्टी च्या धर्तीवर मातंग समाजासाठी आर्टी चि स्थापना करावी , सर्व मागासवर्गीय महामंडळाचे कर्ज माफ करावे ,अण्णाभाऊ साठे महामंडळ त्वरित सुरू करावे ,दलित महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शासनाने ठोस कृती कार्यक्रम राबवावा.या प्रमुख मागण्यांवर लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले .यावेळी शासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या .आमच्या मागण्या मान्य करा ,आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुनाच्या बापाचे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

या आंदोलनात डॉ.मच्छिंद्र सकटे, महिला आघाडी प्रमुख पुष्पलता सकटे, नगरसेविका स्वाती लोखंडे , उपाध्यक्ष लक्ष्मी पवार , काशीनाथ सुलाखे पाटील , शहराध्यक्ष जयंत जाधव , अशोक लोखंडे , मनोज अडागळे, विकास भोंडवे , खंडू पवार , ऍड. राजश्री अडसूळ ,सांगली जिल्हाध्यक्ष विकास बल्लाळ , कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष संजय चांदणे ,महाराष्ट्र सरचिटणीस शंकर महापुरे ,सोलापूर जिल्हाध्यक्ष मारुती नाईकनवरे ,वाळवा अध्यक्ष संतोष चांदणे ,रवी बल्लाळ हे प्रमुख नेते सहभागी झाले होते. आंदोलनास पुणे शहर , जिल्हा मातंग समाज संघटनेने या आंदोलनास पाठिंबा दिला .यासह राज्यातील व पुणे शहरातील प्रमुख कार्यकर्ते , महिला व युवक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading