Sunday, April 5, 2026
LIFESTYLE

धूम्रपान, प्रदूषित धूर, चुलीवर स्वयंपाक यामुळे सीओपीडी आजार होण्याचा धोका

पुणे:- क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) हा एक रोग नाही परंतु एक अशी टर्म आहे जे  क्रोनिक लंग्स डिसीजचे वर्णन करण्यासाठी वापरले जाते आणि जे लंग्सच्या एयरफ्लो मध्ये मर्यादा निर्माण करते. श्वास घ्यायला त्रास होणे, श्वास घेण्यासाठी हवेची गरज असणे आणि तीव्र खोकला होणे ही सीओपीडीची सामान्य लक्षणे आहेत. सीओपीडी हा धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला होणारा खोकला नसून निदान  लागलेले धोकादायक फुफ्फुसांचा आजार आहे ज्यामुळे रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो. संपूर्ण जगाभरातून, चीननंतर भारत  दुसऱ्या क्रमांकावर असलेला असा देश आहे जिथे सीओपीडीचे अधिक प्रकरणे आढळतात, परंतु २०१६ च्या ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी नुसार भारताने चीनला मागे टाकले असून सीओपीडीमुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रकरणांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे.

शारीरिक संघर्ष, श्वास घ्यायला त्रास होणे, दैनंदिन काम करण्यासाठी आणि हालचाल करण्यासाठी संघर्ष होणे या संपूर्ण कारणांमुळे कोणत्याही व्यक्तीचा स्वाभिमान, सन्मान आणि जीवनावरील नियंत्रण गमावण्याच्या भीतीमुळे  भावनिक उत्तेजन निर्माण होऊ शकते. हे एक सीओपीडी रूग्णाचे आयुष्य आहे जिथे रोजचे कामकाज करणे देखील आव्हानात्मक असते. केवळ श्वास न घेता येणे हाच संघर्ष नाही आहे तर सीओपीडी या रोगासह जीवन जगण्यासाठी एक उत्तम मार्ग शोधणे हा आहे. जेव्हा जुने लक्षणे कमी होतात व नवीन लक्षणे विकसित होतात तेव्हा सीओपीडी हा फ्लेयर अप होतो. फ्लेअर-अप्सला  एक्ससीब्रेशन्स किंवा लंग्स अटॅक असे देखील म्हटले जाते. सीओपीडीचा योग्य उपचार न केल्यास अधिक धोका निर्माण होऊ शकतो व मृत्यू देखील होऊ शकते.

भारताला जगातील सीओपीडीची कॅपिटल बनवत भारतात सीओपीडीचे जवळपास ५५ दशलक्षांपेक्षा अधिक रुग्ण आहेत, असे डॉ.बाळासाहेब पवार, एमबीबीएस, एमडी(चेस्ट), दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल,पुणे  म्हणाले. धूम्रपान,औद्योगिकीकरणामुळे निर्माण होणारा प्रदूषित धूर, दीर्घकाळापर्यंत चुलीवर स्वयंपाक करणे यांसारख्या कारणांमुळे सीओपीडी हा आजार होण्याच्या धोका अधिक असतो ज्याला आता लंग्स अटॅक म्हणून ओळखले जाते, असे डॉक्टरांनी सांगितले.

डॉ.एस के टोके,एमबीबीएस,डीएनबी(रेस्पिरेटरी मेडिसिन),पवना हॉस्पिटल,सोमाटणे पुणे म्हणाले की, भारतात या रोगामुळे मुत्यूचे प्रमाण अधिक असतांना देखील लोकांना सीओपीडी बद्दल अत्यंत कमी माहिती आहे. लंग्स अटॅक आल्यानंतर जेव्हा मी रुग्णांना पाहतो तेव्हा त्यांचे लंग्स अधिक खराब झाले असते. योग्य वेळेत उपचार सुरु केल्यास केवळ परिस्थितीचे व्यवस्थापनच होत नाही तर रुग्ण आणि काळजी घेणाऱ्यांच्या जीवनाची गुणवत्ता देखील सुधारते. बीपी, शुगर यांच्यासारखी लंग्सची देखील नियमितपणे तपासणी करणे आवश्यक आहे तसेच लोकांमध्ये याबद्दल जागरूकता निर्माण करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. आपल्यासारख्या विकसनशील देशांमध्ये प्रदूषणाची पातळी जास्त आहे आणि अशा जोखीम घटकांच्या संपर्कात येण्याची अधिक शक्यता असते ज्यामुळे दीर्घकाळापर्यंत लंग्स अटॅक येण्याची शक्यता जास्त असते, असेही ते म्हणाले.

सीओपीडीमुळे लंग्स कॅपॅसिटी तसेच लंग्सच्या फंक्शनवर देखील परिणाम होऊ शकतो, तसेच लंग्स फंक्शनची टेस्ट करून या रोगाचे निदान केले जाऊ शकते. स्पायरोमेट्री ही एक सामान्य लंग्स फंक्शन टेस्ट आहे. ज्यामध्ये स्पायरोमीटर नावाच्या मशीनच्या मदतीने तुम्ही तुमच्या लंग्स मध्ये किती जलद गतीने व किती हवा ओढू शकता हे मोजले जाते. बऱ्याच डॉक्टरांचा असा विश्वास आहे की, सीओपीडी या आजाराच्या निदानासाठी स्पायरोमेट्री टेस्ट ही अत्यंत उत्तम आहे पण ही टेस्ट नियमिपणे केली जात नाही आणि ज्यामुळे या आजाराचे निदान मुख्यत्वे डॉक्टरांच्या नैदानिक बुद्धिमत्तेवर आधारित असते.

परंतु लवकर निदान लागणे यावरच सर्व अवलंबून नसते. नियमितपणे इन्हेलरचा वापर केल्यास लंग्स अटॅकची वारंवारता कमी केली जाऊ शकते. दररोज सीओपीडी रूग्णांची वाढत असलेली संख्या लक्षात घेत, मागील काही वर्षात इन्हेलर आणि इन्हेलरची वितरण प्रणाली विकसित झाली आहे. एयरवेज डीलेटिंग करत तसेच इंफ्लेमेशन कमी करत, स्पेसरसह इन्हेलर किंवा नव्याने ओळखल्या जाणाऱ्या अँक्युटेड इन्हेलरसह आवश्यक औषध, आवश्यक प्रमाणात, थेट फुफ्फुसांमध्ये वितरित केले जाऊ शकते असे डॉ.बाळासाहेब पवार,एमबीबीएस, एमडी(चेस्ट), दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे यांनी सांगितले. तसेच तीव्र अटॅक आल्यास रुग्णाला रुग्णालयात भर्ती करणे आवश्यक असते. परंतु सध्याच्या विकासामुळे या अपरिवर्तनीय परिस्थितीची प्रगती कमी करण्यासाठी बरेच काही केले जाऊ शकते, असेही ते म्हणाले.

प्रारंभिक निदान,योग्य उपचार, उपचाराचे नियमित पालन करणे तसेच स्थितीचे नियमित मूल्यांकन यांसारख्या काही पद्धतींमुळे लंग्स अटॅकची शक्यता कमी केली जाऊ शकते.

रेफ्रंस :- ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading