Tuesday, June 16, 2026
MAHARASHTRAPUNE

राज्यस्तरीय अंकनाद पाढे पाठांतर स्पर्धा – नावनोंदणीस भरघोस प्रतिसाद, १५ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

पुणे : महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्याना उत्तेजन देण्यासाठी, गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी राज्य शासनाच्या सहभागाने मॅप एपिक कम्म्युनिकेशन्स प्रा लि आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धा नावनोंदणीस राज्यभर प्रतिसाद मिळत असून १५ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

मॅप एपिक कम्म्युनिकेशन्स प्रा लि चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार नामजोशी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

मराठी परंपरा संवर्धनाचा विषय असल्याने महाराष्ट्र राज्य शासनाने मराठी विकास संस्थामार्फत सह आयोजक या नात्याने या स्पर्धा आयोजनांत सहभाग घेतला आहे.

या स्पर्धेचे उदघाटन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली झूम मिटिंग द्वारे ३ नोव्हेंबर रोजी ऑन लाईन झाले होते

मंदार नामजोशी म्हणाले,’ अंक नाद पाढे पाठांतर स्पर्धेतून मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळेल. अंकनादच्या संगीतमय पाढ्यांमुळे मुलांचे पाढे सहज ऐकून पाठ होतात. त्याचे परीक्षण होणे गरजेचे आहे. त्यासाठी अंकनाद तर्फे पाढे पाठांतर स्पर्धा ही संपूर्ण महाराष्ट्रात घेण्याचे आयोजन केले आहे. जिल्हा पातळी, राज्य पातळीवर स्पर्धा घेतली जाईल. ही स्पर्धा मराठी भाषेतून घेतली जाईल. सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्याना पाढे पाठांतर स्पर्धा खुली राहील.

विद्यार्थी कोणत्याही माध्यमातून शिकत असला तरी स्पर्धा मराठी भाषेतूनच होईल. पाढे पाठांतर स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यासाठी आहे. स्पर्धा सहभाग नोंदविण्यासाठी गुगल फॉर्म उपलब्ध करून दिला जाईल

स्पर्धेचे नियोजन :
जिल्हा पातळीवर : विद्यार्थ्यानी आपल्या गटानुसार सांगितलेले पाढे म्हणताना व्हिडीओ क्लिप अंक नाद वेबसाईटवर अपलोड करतील. जिल्हास्तरावरील यशस्वी विद्यार्थ्याना त्या त्या गटातील इयत्ताचा अंकनाद सेट बक्षीस देण्यात येईल.

राज्य पातळीवर : विभागनिहाय यशस्वी विद्यार्थ्यांना पाढ्यांवर आधारीत गणितीय आकडेमोड यावर परीक्षण करण्यात येईल

प्रवेश ,सहभाग आणि पारितोषिके
जिल्हा पातळी : प्रत्येक गटातून पहिले तीन आणि उत्तेजनार्थ दोन

राज्य पातळी : प्रत्येक विभागातील पहिल्या दोन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. यातून प्रत्येक गटातून पहिले तीन आणि उत्तेजनार्थ दोन सर्व सहभागी विद्यार्थ्याना प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच यशस्वी विद्यार्थ्याना आकर्षक बक्षीस व मानचिन्ह देण्यात येईल. प्रत्येक गटात राज्य पातळीवर रुपये ११ हजार, ७ हजार, ५ हजार अशी पहिल्या ३ क्रमांकांना रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.

ही स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यासाठी दिलेल्या लिंकवरील गुगल फॉर्म भरुन आपल्या जिल्ह्यासाठी नोंदणी करु शकतील .
जिल्हा पातळीवर विद्यार्थ्याचा दिलेल्या गटानुसार पाढा म्हणतानाचा व्हिडीओ अपलोड अंक नाद वेबसाईटवर अपलोड करावा लागेल.

बालगट (वयोगट – 4 ते 6) पहिली साठी अंक उच्चार 1 ते 100 असा स्पर्धेचा विषय आहे . दुसरी, तिसरी साठी 1ते 10 पाढे, 11 ते 20 पाढे, 21 ते 30 पाढे असा स्पर्धेचा विषय आहे .चौथी, पाचवी साठी पावकी, निमकी असा स्पर्धेचा विषय आहे .
सहावी, सातवी साठी पाऊणकी, सवायकी असा स्पर्धेचा विषय आहे .
आठवी, नववी, दहावी साठी दिडकी, अडीचकी, औटकी, एकोत्रे असा स्पर्धेचा विषय आहे . खुला गट मध्ये पावकी, निमकी, पाऊणकी, सवायकी, दिडकी, अडीचकी, औटकी, एकोत्रे असा स्पर्धेचा विषय आहे .

अधिक माहिती आणि निःशुल्क नावनोंदणीसाठी
http://www.mahaaanknaad.com या संकेतस्थळावर सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading