Wednesday, June 17, 2026
ENTERTAINMENTTOP NEWS

‘कोल्हापूर टू बुलडाणा व्हाया इस्त्राईल’ प्रविण तरडे घेऊन येणार हटके लव्ह स्टोरी

शेतकऱ्यांच्या व्यथा, सत्यघटनांवर आधारित कलाकृती सादर करणारा मराठीतला दिग्दर्शक म्हणजे प्रवीण तरडे. पण यावेळी प्रवीण तरडे त्याने यापूर्वी न हाताळलेला विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रवीण तरडेच्या आगामी सिनेमाचं नाव आहे, ‘कोल्हापूर टू बुलडाणा व्हाया इस्त्राईल.’ ही एक लव्हस्टोरी आहे. नुकतीच त्याने या चित्रपटाची घोषणा केली आहे.

प्रवीण तरडे सध्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शन मध्ये व्यस्त आहे. प्रवीण तरडेने आपल्या चित्रपटाबद्दल माहिती देताना सांगितलं, “मी माझ्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये एक लव्ह स्टोरी घेऊन येत आहे. परंतु प्रेमकथा एखाद्या सामान्य प्रेमकथेसारखी नाही माझे चित्रपट शेतकऱ्यांशी जोडलेले आहेत किंवा सामाजिक विषयांवर प्रकाश टाकतात; प्रेमकथेतही हे मुद्दे असतील. माझ्या नव्या चित्रपटाचे नाव कोल्हापूर ते बुलढाणा व्हाया इस्त्राईल आहे.”

कोल्हापूर ते बुलडाणा व्हाया इस्त्राईल या चित्रपटाबद्दल अधिक माहिती देताना प्रवीण सांगतो की, ‘इस्त्राईलमध्ये शेतीसाठी अनुकूल परिस्थिती नाही तरीही त्यांनी शेतीमध्ये बराच विकास केला आहे. माझ्या कथेतील पात्र याच विषयाचा अभ्यास करताना दिसतील आणि त्यातून एक छानशी प्रेमकथाही प्रेक्षकांच्या भेटीला येईल.’ प्रवीण तरडेच्या नव्या चित्रपटामध्ये नवोदित कलाकारांना संधी मिळणार आहे. प्रवीणचे चाहते त्याच्या नव्या सिनेमाबद्दल उत्सुक आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading