Sunday, June 21, 2026
PUNE

एम सी ई सोसायटी तर्फे महात्मा फुले यांना अभिवादन

पुणे :‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’(आझम कॅम्पस )च्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त गंज पेठेतील फुले स्मारक येथे जाऊन अभिवादन करण्यात आले.

आझम कॅम्पस तर्फे दरवर्षी काढण्यात येणारी अभिवादन मिरवणूक यावर्षी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली होती..

संस्थेचे सचिव डॉ. लतीफ मगदूम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे पदाधिकारी, हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशन ट्रस्ट, गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त आणि अवामी महाज ‘ संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. यात प्रामुख्याने शाहिद इनामदार, वाहिद बियावानी, सिकंदर पटेल, मोहम्मद हनीफ शेख, अब्दुल वहाब, मशकूर अहमद शेख, बगुद्दीन शेख, शाहिद मुनीर शेख, अफजल खान, सिराज सुतार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

गेली १६ वर्षे ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’(आझम कॅम्पस ) च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात. संस्थेच्या सर्व शैक्षणिक आस्थापनातील १० हजार विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यामध्ये सहभागी होतात आणि महामानवाचे मानवतेचे संदेशांचा प्रसार करतात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading