Tuesday, June 16, 2026
PUNE

कलाकारांचे प्रश्न शासन दरबारी मार्गी लावणार-मेघराज राजेभोसले

पुणे:-अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात आला.

या निम्मिताने पुण्यातील चित्रपट, नाट्य व लोककला क्षेत्रातील कलावंत, तंत्रज्ञ, कामगार यांची आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात अली. याचवेळी कलावंतांना मोफत आरोग्य विमा देण्यात आला. डॉ शंतनू जगदाळे यांनी या प्रसंगी कलाकारर्ण भेटवस्तू दिल्या. तसेच आम्ही पुणेकर व हडपसर मधील कलावन्तांनी अध्यक्षांची धान्य तुला केली व ते धान्य गरजू कलावंतांना देण्यात आले. याप्रसंगी अभिनेते माधव अभ्यंकर, अभिनेत्री सुवर्णा काळे, शहाजी पाटील, आरपीआय राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी, निर्माता अनिल गुंजाळ, अभिनेता प्रशांत बोगम, अभिनेता नागनाथ गावसाने , निर्माते दत्ता दळवी, जर्नालिस्ट अससोसिएशनचे अध्यक्ष समीर देसाई, आम्ही पुणेकर संस्थेचे हेमंत जाधव, अभिनेता किचू भिंगारे, अभिनेता कुणाल देशमुख व इतर कलावंत उपस्थित होते.
मेघराज राजेभोसले यांचा वाढदिवस नाशिक मध्ये आरोग्य शिबीर घेऊन ज्येष्ठ कलावंतांनी फळाचे वाटप करून, औरंगाबाद येथे ब्लॅंकेट वाटप , भाळवणी येथे शनी मंदिरात अभिषेक व प्रसाद वाटप , अहमदनगर येथे कलावंतांना ब्लॅंकेट वाटप व जालना वृद्धाश्रमात फळांचे वाटप , तसेच कोल्हापूर ,मुंबई , नागपूर , बीड , सातारा ,या ठिकाणीही विविध सामाजिक उपक्रम राबविले गेले.


आपल्या वाढदिवसाच्या निम्मित घेतलेल्या उपक्रमणांना उत्तर देताना मेघराज राजेभोसले यांनी सर्व कलावंतांचे , सभासदांचे आभार मानले व शासन दरबारी कलावंतांचे प्रश्न प्राधान्याने मांडण्याचे सूतोवाच केले .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading