मनपाने अमेनिटी स्पेस विक्री थांबवावी अन्यथा आंदोलन करण्याचा वंचित चा इशारा

पुणे, दि. २० – पुणे महानगरपालिका यांनी त्यांच्याकडील शहराच्या विकास संदर्भात ज्या बांधकाम परवानगी देत असताना अमेनिटी स्पेस म्हणून रिकाम्या जागा घेतलेल्या आहेत त्या अमेनिटी स्पेस जमिनीवर सार्वजनिक हितासाठी चे प्रयोजन करण्यात येत जसे सार्वजनिक उद्यान दवाखाने खेळाचे मैदान सामाजिक संस्थां साठीचे विविध उपक्रमासाठी राबविण्यासाठी उपयोगात आणल्या जातात अशा मोकळ्या जमिनी म्हणजे अमेनिटी स्पेस खासगी बांधकाम व्यवसायासाठी विक्री करण्यासाठीचा प्रस्ताव कर्यांनीवित केलेला आहे, तो प्रस्ताव तात्काळ मागे घेण्यात यावा अन्यथा आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला.

वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली या वेळी पुणे शहर अध्यक्ष मूनव्वर कुरेशी कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल गुजर,प्रवक्ते गौरव जाधव,कायदेशीर सल्लागार मनोज माने,उपाध्यक्ष विकास भेगडे यांनी पत्रकार यांच्याशी सवांद साधला.
सदरचा प्रस्ताव मंजूर झाला तर भविष्यात शहर विकासासाठी बाधा निर्माण होऊ शकतात त्यामुळे सदरचा प्रस्ताव थांबविण्यात यावा असे लेखी मागणीचे निवेदन देण्यात आले होते कोरोना च्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका खालावलेली आर्थिक परिस्थितीचे कारण पुढे करून सदर जमिनी सत्ताधारी व विरोधकांच्या बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव घातला असल्याने प्रफुल्ल गुजर यांनी आरोप केलेला आहे जर खरच पुणे मनपाचे आर्थिक परिस्थिती बिकट झालेली असेल तर सदरच्या अमेनिटी स्पेस जमिनीवर वेगवेगळ्या योजना व उपक्रम राबवून त्यातून महसुलब उपलब्ध होऊ शकतो तश्या योजना व उपक्रम वंचित बहुजन आघाडी यांच्याकडे असून महानगरपालिकेने आम्हाला पाचारण करावे ते आपल्यासमोर मांडण्यात येतील असेही प्रफुल्ल गुजर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे
पुणे महानगरपालिका आयुक्त यांनी निवेदनावर केलेल्या कारवाईची माहिती अद्याप दिलेली नाही जर पुढील पंधरा दिवसात पक्षाने दिलेल्या निवेदनावर कोणतीही कारवाई केली नाही तर पक्षाच्या वतीने आंदोलनाची भूमिका घेण्यात येईल
सदर आंदोलनास महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील अशी प्रफुल्ल गुजर यांनी जाहीर केलेली आहे

पुणे महापालिकेतील 118 जागांवरील एकूण 34 एकर जमीन (ॲमिनिटी स्पेस) हा महापालिकेने विकायला किंवा भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव घेतलेला आहे, ही संकल्पना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार तसेच पुणे महापालिकेचे महापौर यांच्या डोक्यातून आलेली असून एका प्रकारे पुणेकरांच्या न्याय हक्कांवर गदा आणण्याचे काम या प्रस्तावातील होणार आहे. पुणे शहरामध्ये तसेच नव्याने समाविष्ट गावांमध्ये खेळाची मैदाने, नाना -नानी पार्क, शाळा, दवाखाने यांचा अभाव असताना ही जागा विकायला काढणे किंवा भाडेतत्त्वावर देणे याचा घाट महापालिकेने घातलेला आहे.
कोरोना सारख्या एकाच संकटात पुणे महापालिकेने हात टेकले असून आताचे भाजप किंवा काँग्रेस-राष्ट्रवादीचे महापालिकेची सत्ता असणाऱ्या पक्षांची वाटचाल कोणत्या दिशेने चालू आहे, यावर पुणेकरांनी विचार करावा.
हा प्रस्ताव जर पुढील काळात आक्रमक अशी भूमिका वंचित बहुजन आघाडी घेताना दिसेल.
गौरव जाधव प्रवक्ते, पुणे शहर. यांनी आपली भूमिका मांडली

Leave a Reply

%d bloggers like this: