एसाच्या अध्यक्षपदी आर्किटेक्ट पुष्कर कानविंदे

पुणे – आर्किटेक्ट, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन, पुणे (एसा) या संस्थेच्या अध्यक्षपदी आर्किटेक्ट पुष्कर कानविंदे तर उपाध्यक्षपदी इंजिनिअर पराग लकडे यांची निवड करण्यात आली आहे.

संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पुणे झाली. सन 2020 ते 2022 या कालावधीसाठी निवडण्यात आलेल्या कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आली. कार्यकारिणीत माजी अध्यक्ष आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी, कार्याध्यक्ष आर्किटेक्ट हर्षल कवडीकर, सचिव आर्किटेक्ट महेश बांगड, सहसचिव इंजिनिअर संजय पटवर्धन, आर्किटेक्ट मनाली महाजन, खजिनदार आर्किटेक्ट संजय तासगावकर यांचा समावेश असून कार्यकारिणी सभासद म्हणून इंजिनिअर दिवाकर निमकर, आर्किटेक्ट मकरंद गोडबोले, आर्किटेक्ट राम पराडकर, आर्किटेक्ट निनाद जोग यांची निवड करण्यात आली आहे. निर्वाचन अधिकारी म्हणून आर्किटेक्ट हेमंत साठ्ये यांनी काम पाहिले.

Leave a Reply

%d bloggers like this: