Saturday, September 5, 2026
MAHARASHTRATOP NEWS

राज्यात आतापर्यंत १६लाख रुग्ण कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट सुधारला

मुंबई – राज्यात मागील २४ तासात ४ हजार १३२ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ४ हजार ५४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण १६ लाख ९ हजार ६०७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आजघडीला महाराष्ट्रात ८४ हजार ८२ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट हा ९२.४८ टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading