Saturday, September 5, 2026
PUNE

मनोज कांबळे यांचा पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल


पुणे, दि. १२ – पुणे पदवीधर मतदार संघातून नॅशनल स्टुडंटड युनियन ऑफ इंडिया (NSUI) माजी प्रदेशाध्यक्ष व मातंग समाजाचे नेते मनोज कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला.नुकतेच राज्यपाल नियुक्त विधानपरिषद मातंग समाजाला मिळाली नसल्याने मातंग समाजात प्रचंड नाराजी होती .याच पार्श्वभूमीवर कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचे सांगितले आहे.त्यांच्या उमेदवारी ला NSUI आणि मातंग समाजाच्या विविध पक्ष संघटनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिल्याचे सांगितले आहे.
मातंग समाजाला प्रत्येक पक्ष हा गृहीत धरीत असून आजपर्यत मातंग समाजाला नेहमीच सर्वच राजकीय पक्षाने डावलले असून .सध्याच्या मंत्रिमंडळात ही एकही मातंग समाजाला मंत्रिपद मिळाले नाही या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आणि मातंग समाजाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे मनोज कांबळे यांनी सांगितले .
उमेदवारी अर्ज दाखल करताना मातंग समाजाच्या विविध संघटनांचे प्रमुख नेते व कारकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी रिपब्लिकन मातंग आघाडीचे प्रदेशादयक्ष हनुमंत साठे,लहुजी समता परिषद अध्यक्ष अनिल हातागळे, राष्ट्रीय बहुजन महासंघ अध्यक्ष बाळासाहेब भांडे,मागासवर्गीय परिवर्तन संघटना विजय डाकले ,दलित युवक आंदोलन सचिन बगाडे ,मातंग एकता आंदोलन कार्याध्यक्ष अविनाश बागवे ,बहुजन सेने चे निलेश वाघमारे,रिपाई (अ) चे अध्यक्ष अशोक जगताप ,लहुजी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश वैराळ यासह विविध पक्ष संघटनाचे प्रमुख नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading