fbpx
Thursday, April 25, 2024
PUNETOP NEWS

वंचित बहुजन आघाडीचे प्रा. सोमनाथ साळुंखे यांचा पुणे पदवीधरसाठी अर्ज दाखल

पुणे – पुणे पदवीधर मतदार संघातील सार्वत्रिक निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रा. सोमनाथ जनार्दन साळुंखे यांनी आज बुधवार रोजी पुणे येथे विभागीय आयुक्त कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव अनिल जाधव, पुणे शहर अध्यक्ष मुन्नावर कुरेशी पुणे वडगाव विधानसभा कार्यक्षेत्र अध्यक्ष विवेक लोंढे, पुणे शहर महासचिव महेश कांबळे, जितेंद्र जाधव, उपाध्यक्ष प्रविण गायकवाड, अँड. मनोज माने, आप्पासाहेब क्षीरसागर,राजन नायर सम्यक विद्यार्थी आंदोलन चे पुणे जिल्हाध्यक्ष शुभम चव्हाण पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संतोष जोगदंड, सयाजीराव झुंजार, संजय माळी अक्षय बचुटे (गोटेगावकर)यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

वंचित आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच प्रा. सोमनाथ साळुंखे यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. प्रा. सोमनाथ साळुंखे हे सॉफ्टवेअर इंजिनिअर असुन अभियांत्रिकी महाविद्यालयात गेली १३ वर्षांपासून अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहेत. ते विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. गेल्या पाच वर्षांपासून पश्चिम महाराष्ट्रात पदवीधर परिवर्तन विकास माध्यमातून अनेक नवीन संकल्पना,सामाजिक उपक्रम राबवून अनेक बदल घडवून आणले. समाजातील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन समाजबांधवांना न्याय मिळवून दिला आहे. स्वाफ्टवेअर इंजिनिअर असणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम राबवून उठावदार काम केले आहे. नेहरू यूवा पुरस्कार प्राप्त असलेल्या साळुंखे सरांनी माध्यमातून भरीव कामगिरी करून सामाजिक कामाचा ठसा उमटविला आहे.

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगली जिल्ह्यातील क्रांतिकारी वारसा असणाऱ्या चळवळीतील युवक कार्यकर्त्याला पाठबळ देण्याच्या दृष्टीने प्राध्यापक सोमनाथ साळुंखे यांना पुणे पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे.

पदवीधरांच्या अनेक समस्या बेरोजगारीचा प्रश्न अशा अनेक प्रश्नासाठी प्रामुख्याने साळुंखे सरांनी काम उभे केले आहे. पदवीधरांची स्वतंत्र जनगणना व्हावी, जिल्हानिहाय बेरोजगार पदवीधरांसाठी रोजगार मिळावे, खाजगी कंपन्या व इण्डस्ट्रीमध्ये प्लेसमेंट सुविधा, स्पर्धा परीक्षा माहितीसाठी जिल्हानिहाय केंद्र, शेतीपूरक जोडधंदे व्यवसाय निर्मितीसाठी पदवीधरांना चालना मिळण्यासाठी प्रयत्न, जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न अशा अनेक सरांच्या व जनसामान्यांच्या प्रश्नासाठी आपली उमेदवारी असल्याचे प्रा. सोमनाथ साळुंखे यांनी सांगितले.

समाजकारण आणि राजकारण त्याची सांगड घालत अनेक सामाजिक प्रश्न तडीस नेण्यासाठी पदवीधरांच्या आपल्या हक्काचा आपला माणूस म्हणून कृतिशील उमेदवार प्रा. सोमनाथ साळुंखे उमेदवारी असल्याचे सांगितले. सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा व सोलापूर अशा जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते समर्थक उपस्थित होते.

पदवीधरांनी काम करण्याची संधी द्यावी – प्रा. सोमनाथ साळुंखे

पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी आपल्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रयत्नशील राहणार आहे. तरी मतदार बंधू-भगिनींनी आपले प्रथम पसंतीचे मत देऊन काम करण्याची संधी द्यावी असे आवाहन प्रा.साळुंखे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading