‘असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया’च्या शोध निबंध  स्पर्धेत डॉ. रविराज टिल्लू प्रथम

पुणे :-  ‘असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया’ ने आयोजित केलेल्या शोध निबंध स्पर्धेत पुण्यातील डॉ. रविराज टिल्लू यांना प्रथम क्रमांक मिळाला. अंतिम स्पर्धा फेरीमध्ये निवड समितीतर्फे सर्जरीतील सर्वोत्तम प्रतिभा असलेले डॉक्टर म्हणून ‘टोरेंट यंग स्कॉलर अवॉर्ड’ या प्रथम पुरस्कारासाठी डॉ रविराज टिल्लू यांना विजेता म्हणून घोषित करण्यात आले आहे.  
 ‘ असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया’ही सर्जन्सची देशव्यापी संस्था आहे. या संस्थेतर्फे सर्जरीतील सर्वोत्तम प्रतिभा शोधण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.संपूर्ण भारतातील शासकीय रुग्णालयात फायनल इयर एम एस शिकत असलेले सुमारे 15000 विद्यार्थी आहेत. त्यापैकी सुमारे 2000 विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेस बसतात. अंतिम स्पर्धेसाठी देशातील 5 ते 6 राज्याचा एक झोन याप्रमाणे सहा झोन केले जातात.  या सहा झोन्समधून प्रत्येकी फक्त दोन डॉक्टर अंतिम स्पर्धेसाठी निवडले जातात. ‘ऑबस्ट्रकटिव्ह जॉनडीस ‘ या विषयावरील  शोध निबंध डॉ. रविराज टिल्लू यांनी प्रथम फेरीत मांडला.भारताच्या वेस्ट झोनचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉ. रविराज टिल्लू यांना के.इ.एम रुग्णालय, मुंबई चे  डॉ अभय दळवी, डॉ. समीर रेगे, डॉ. राम प्रभू यांचे मार्गदर्शन लाभले आहे.डॉ. रविराज टिल्लू यांच्या यशाबद्दल मोहन टिल्लू ,मकरंद टिल्लू ,डॉ सतीश देसाई यांनी अभिनंदन केले.  
सर्जरीतील पुढील  तांत्रिक शिक्षणासाठी संस्थेतर्फे डॉ. रविराज टिल्लू यांना जपान येथे लवकरच पाठविण्यात येणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: