सार्वजनिक ठिकाणी फटाक्यांना बंदी

पुणे: शहरातील महापालिकेच्या मालकीची सार्वजनिक ठिकाणे शाळा,उद्याने ,पर्यटन स्थळे याठिकाणी फटाके उडवण्यास महापालिकेने बंदी घातली आहे. त्याचबरोबर इतर ठिकाणी फटाक्यांचा कमीत कमी पावर करावा अथवा टाळावे असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात अनेक ठिकाणी नागरिक मोठ्याप्रमाणार गर्दी करत आहेत. त्यामुळे सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे. कोरोनाकाळातील नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे आहे. दिवाळीमध्ये मोठ्याप्रमाणात फटाक्यांमुळे वायूप्रदुषण आणि ध्वनीप्रदुषण होते. याचे परिणाम अनेक दिवस दिसून येतात. त्यामुळे शक्य तो कमी धुराचे आणि आवाज होणार नाही अशा फटाक्यांचा वापर करावा असे आदेशात नमुद करण्यात आले आहे. दिवाळीच्या काळात सॅनिटायजरचा वापर शक्य तो टाळावा. सॅनिटायजरचा आग पकडत असल्यामुळे सॅनिटायजरचा वापर करु नये. त्याऐवकी साबणाने हात स्वच्छ धुवावेत. नियमीतपणे हात धुवावेत.
दिवाळी सणामध्ये सार्वजनिक दिवाळी फराळ आणि दिवाळी पहाट यांना कोणतेही परवाणगी देण्यात आलेली नाही. सार्वजनिक ठिकानी थुंकने, मास्कचा वापर न करणे, विना परवाणा कार्यक्रमांचे आयोजन केल्यास पोलिस आणि महापालिका प्रशासन कारवाई करणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: