‘महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर’ च्या निवडणुकीत डॉ पी ए इनामदार यांचा पॅनल विजयी 


पुणे :  ‘महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर’ या संस्थेच्या  निवडणूकीत डॉ पी ए इनामदार यांच्या नेतृत्वाखाली ‘अवामी महाज’ पॅनल विजयी झाले. ही निवडणूक मंगळवारी १० नोव्हेंबर रोजी पार पडली. आझम कॅम्पस मधील युनानी वैद्यकीय महाविद्यालय या संस्थेकडून चालविले जाते. पेट्रन विभागातून  डॉ पी ए इनामदार,डॉ एन वाय काझी हे बिनविरोध निवडून आले. आजीव सदस्य विभागातून आबेदा इनामदार,डॉ नाझीम शेख विजयी झाले. 
 सर्वसाधारण सदस्यांमधून डॉ अरिफ अली मोहमद मेमन,इरफान वली महमद खान,डॉ मुश्ताक मुकादम,दिलशाद शफिक पठाण,प्रा.मुझफ्फर शेख विजयी झाले. 
‘एक ध्येय्य बाळगून सामाजिक उद्देशाने आम्ही संस्थेत कार्यरत आहोत . संस्थेच्या प्रगतीसाठी सर्व पॅनल यांनतर देखील अखंड कार्यरत राहील’ अशी प्रतिक्रिया ‘अवामी महाज ‘ पॅनल चे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांनी व्यक्त केली.   

Leave a Reply

%d bloggers like this: