Saturday, June 13, 2026
MAHARASHTRATOP NEWS

तीव्र पोटदुखीमुळे धनंजय मुंडे लिलावती रुग्णालयात दाखल

मुंबई, दि. १० – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पोटात दुखत असल्याने ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांनी स्वतः ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे.

‘तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी आज मुंबईच्या लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. प्रकृती स्थिर असून उपचार घेऊन मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईन’, असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.

दरम्यान, जून महिन्यात धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर ११ दिवसांनी त्यांची चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यानंतर ते होम क्वारंटाईन होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading