धनंजय कांबळे यांची लहुजी शक्ति सेनेच्या पुणे शहर उपाध्यक्ष पदी निवड

पुणे – लहुजी शक्ती सेना या राज्यभर सामाजिक कार्य करणाऱ्या राज्यव्यापी संघटनेच्या पुणे शहर उपाध्यक्ष पदी सामाजिक युवा कार्यकर्ता म्हणून परिचित असणारे धनंजय कांबळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे .कांबळे हे शहरात विविध सामाजिक ,सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात गेली 10 वर्षापासून कार्यरत आहेत .त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना सेनेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
त्यांना नियुक्तीचे पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे व
शहराध्यक्ष अविनाश खिलारे यांच्या हस्ते संघटनेच्या पुणे येथील प्रदेश कार्यालयामधे देण्यात आले. या प्रसंगी दिनेश चव्हाण, अनिकेत जवळेकर यासह संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: