Thursday, September 3, 2026
MAHARASHTRATOP NEWS

अर्णब गोस्वामींना जामीन नाहीच

मुंबई : रिपब्लिक टिव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामिन अर्ज फेटाळूला आहे. तसेच जामीनासाठी कनिष्ठ न्यायालयात जाण्याचे आदेश ही उच्च न्यायालयाने गोस्वामी यांना दिले आहेत.

इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णब यांना अटक करण्यात आली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत अन्वय यांनी अर्णब आणि इतर दोघांची नावे लिहीली होती. रिपब्लिक वृत्तवाहिनीचे काम पूर्ण केल्यानंतर ८३ लाख रुपये बुडविल्याचा आरोप या चिठ्ठीत अन्वय यांनी केला आहे. अटकेनंतर अर्नब यांना अलिबाग न्यायलायात हजर केले असता न्यायालाने अर्णब यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

७ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत सगळ्या पक्षकारांच्या युक्तिवादांचा विचार करून आम्हाला निर्णय द्यायचा असल्याचे सांगत न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने निर्णय राखून ठेवला होता.

अखेर आज पून्हा एकदा न्यायालयाने गोस्वामी यांचा जामीन फेटाळला. आमचे विशेषाधिकार वापरून तातडीचा अंतरिम जामीन देण्याचे प्रकरण नसल्याने आरोपी कनिष्ठ न्यायालयात जाऊ शकतो. कनिष्ठ न्यायालय चार दिवसांच्या कालावधीत त्यावर निर्णय घेईल, असं उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. अर्णब गोस्वामी यांच्याबरोबरच न्यायालयाने सहआरोपी नितीश सारडा आणि फेरोज शेख यांचा जामीनही फेटाळला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading