प्रवक्त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे – चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. ६ – एखादा विषय समजणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते .त्यामुळे आपल्या अभ्यासात सातत्य राखणे ही प्रवक्ता म्हणून आपली प्राथमिकता असावी असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केले.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे भाजपा प्रवक्ता आणि पॅनेलिस्ट साठी आयोजित केलेल्या अभ्यासवर्गात ते बोलत होते. या वेळी प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, माधवी नाईक, खा.डॉ. भारती पवार, मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे आदी मान्यवर तसेच राज्यभरातील प्रवक्ते आणि पॅनेलिस्ट उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, पक्षाची भूमिका मांडताना विचाराची स्पष्टता असणे अत्यंत महत्वाचे असते. एखाद्या विषयाची इत्यंभूत माहिती होण्यासाठी अभ्यासात आणि चिंतनात सातत्य ठेवणे ही आपली प्राथमिकता असावी. पक्षाची भूमिका मांडण्यासाठी आवश्यक कौशल्येही अवगत असणेही गरजेचे आहे. दूरचित्रवाणी वाहिन्यांवर व अन्य व्यासपीठांवर होणाऱ्या चर्चेच्या वेळी हजरजबाबीपणा, संयमही तितकाच गरजेचा असतो. वेळोवेळी आपल्या ज्ञानाची, कौशल्याची अशा अभ्यासवर्गाच्या माध्यमातून मशागत करणे आवश्यक आहे. प्रास्ताविक करताना मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या वर्गाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली.

Leave a Reply

%d bloggers like this: