Tuesday, June 16, 2026
MAHARASHTRATOP NEWS

विधानपरिषद – उर्मिला, खडसे यांच्यासह आनंद शिंदे, अनिरुद्ध वनकर यांच्या नावाची शिफारस

मुंबई, दि. ६ – विधानपरिषदेच्या बहुचर्चित १२ आमदारांच्या नावांची यादी अखेर महाविकास आघाडी सरकारकडून राज्य़पालांकडे सोपविण्यात आली आहेत. गेल्या काही दिवसांपासून ही नावे कोणती असणार याची उत्सुकता होती, मात्र हे गूढ अद्यापही स्पष्ट झालेले नाही. साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील १२ आमदार हे राज्यपाल नामनिर्देशित असतात, या १२ नावे राज्य सरकारने ठरवून या नावांचा सीलबंद खलिता राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे, या १२ नावांमध्ये अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, नुकतेच भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे यांच्यासह आनंद शिंदे आणि अनिरुद्ध वनकर या आंबेडकरी चळवळीतील गायकांच्या नावाचा समावेश असल्याचे समजते.

शिवसेनेतर्फे परिवहनमंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी राज्यपालांची भेट घेत ही नावे सादर केली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन ही नावे राज्यपालांकडे सोपविण्यात आल्याची माहिती, या भेटीनंतर अनिल परब यांनी सांगितले आहे. राज्यपाल कधीपर्यंत निर्णय़ घेतील, याची कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच मुदत पूर्ण झाल्यानंतर पुढे काय करायचे, हे अद्यापही ठरलेले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १२ आमदारांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती, त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाकडून कोणती १२ नावे असणार, याची गुप्तता सरकारकडून पाळण्यात आली आहे. मंदिरे खुली करण्याच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांच्यात कटूता निर्माण झाली आहे. याचा परिणाम म्हणून या १२ नावांपैकी काही नावे निकषात बसत नाही या कारणाखाली राज्यपाल फेटाळण्याची शक्यता आहे. ही नावे साहित्य, सांस्कृतिक पार्श्वभूमीची नसल्याचे कारण यासाठी देण्यात येण्याची शक्यता आहे. . केंद्र आणि राज्य सरकारमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या तणावाचा परिणाम या १२ आमदारांच्या नियुक्तीवर होण्याची शक्यता आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली होती.

ही आहेत १२ नावे
राष्ट्रवादी – एकनाख खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, आनंद शिंदे

काँग्रेस – रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसेन, अनिरुध्द वनकर

शिवसेना- उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर, नितीन बानगुडे पाटील

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading