रंग भूमी दिनानिमित्त “ऑल आर्टिस्ट फाउंडेशन” चे उद्धाटन

पुुणे:-जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून लावणी ,लोकधारा,ऑर्केस्ट्रा, नाटक,सिनेमा,जादूगार,बॅकस्टेज व कलेच्या प्रत्येक घटकामध्ये कार्य करणाऱ्या कलाकारांना संघटित करून “ऑल आर्टिस्ट फाउंडेशन”या संस्थेची स्थापना करण्यात आली. जेष्ठ बँकस्टेज कलाकार दत्तात्रय शिंदे व माजी महापौर दीपक भाऊ मानकर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.कलाकारांना ओळखपत्र वाटप ,आरोग्य तपासणी व आरोग्य विमा वाटप करण्यात आला.शासन दरबारी कलाकारांची नोंद घ्यावी व स्वयं रोजगार व लघुउद्योगांच्या माध्यमातून कलाकार व त्याच्या कुटुंबाला हाताला काम व खिशाला दाम मिळवून देणे. लोककलाकार बॅकस्टेज कलाकार ,ऑर्केस्ट्रा कलाकारांना शासनाची पेन्शन मिळवून देणे सर्व कलेच्या घटकातील कलाकारांचा सर्वांगीण विकास करणे हे प्रमुख उद्दीष्टे असल्याचे अध्यक्ष योगेश सुपेकर यांनी सांगितले.या प्रसंगी सुरेश देशमुख, डॉ सतीश देसाई,अशोक नाईकरे, अभिनेता रमेश परदेशी ,विजय उलपे, सुनील महाजन,अर्चना शहा, बाबा शिंदे यांच्या सह संस्थेचे संचालक व सभासद कलाकार उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: