सचिन फोलाने यांची भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्षपदी निवड

पुणे : भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सचिन फोलाने यांची निवड करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या हस्ते फोलाने यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. 
यावेळी भाजपा पुणे शहराध्यक्ष  जगदीश मुळीक, आमदार सुनील कांबळे, माधुरी मिसाळ, मुक्ता टिळक, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष राघवेंद्र मानकर, माजी आमदार योगेश टिळेकर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, गणेश घोष, उद्योजक समीर पाटील, उदय कड, संतोष लांडे, सौरभ आथणीकर, शशिकांत कांबळे, रितेश वैद्य उपस्थित होते. 
सचिन फोलाने हे प्रभाग अध्यक्ष, मतदारसंघ सरचिटणीस तसेच गेली अनेक वर्षे भारतीय जनता पार्टी व सूर्योदय फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत आहेत. पक्षाच्या माध्यमातून काम करताना मिळालेली प्रत्येक जबाबदारी पार पाडली आहे. पक्षाने विश्वास दाखवून मोठी जबाबदारी दिली असून या पदाच्या माध्यमातून काम करताना पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे फोलाने यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: