महिला, जेष्ठ नागरिकांसाठी मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र  लायन्स क्लब इंटरनॅशनल चा पुढाकार 

पुणे, दि. 5 – लायन्स क्लब इंटरनॅशनल तर्फे महिला व जेष्ठ नागरिकांसाठी मोफत कायदेविषयक सल्ला केंद्राचे उद्घाटन  न्या.  सुभाष हरताळकर ,अंजली आपटे लायन्स क्लब चे  प्रांतपाल  सीए अभय शास्त्री यांच्या हस्ते झाले. 4 नोव्हेंबर 2020 रोजी यांनी कर्वे रोड येथे या  मोफत कायदेविषयक सल्ला केंद्राचे उद्घाटन ऑन लाईन कार्यक्रमाद्वारे झाले. 
पैशाअभावी न्यायालयात दाद मागू शकत नाहीत अशा स्त्रिया व ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी लायन विधीज्ञ प्रीती परांजपे व विधीज्ञ दामोदर भंडारी मोफत सल्ला देणार आहेत. दर बुधवारी सायंकाळी चार ते सहा या वेळेत मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र सुरू राहील. याप्रसंगी  अनुराधा शास्त्री,  परमानंद शर्मा, हिमांशू सराफ, सागर भोईटे, सोनिया गोळे, विधीज्ञ समीर परांजपे, विधीज्ञ दिव्या वाडेकर उपस्थित होते. तसेच  झूमद्वारे द्वितीय उपप्रांतपाल  राजेश कोठावदे,  तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झोन चेअरपर्सन अॅडवोकेट प्रीती परांजपे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय लायन्स प्रांताच्या अध्यक्षा साधना पाटील यांनी करून दिला .  रिजन चेअरपर्सन लायन सुनिता मालपाणी यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: