Thursday, September 3, 2026
Business

सीएसबी बॅंकेची पिंपरी येथे नवीन शाखा सुरू


पुणे, दि. 5 — शंभर वर्षांची परंपरा असलेली खासगी क्षेत्रातील सीएसबी बॅंक लि. आता देशभरातील प्रमुख ठिकाणी आपला विस्तार करू लागली आहे. या विस्तार योजनेचा भाग म्हणून बॅंकेने कालिका चेंबर्स, तळमजला, एसआर क्र. २०६, सीटीएस क्र. ४७१६, थायसनक्रूप इंडस्ट्रीजसमोर, कॅनरा बॅंकेशेजारी, पिंपरी, ४११०१८ येथे नवी शाखा उघडली आहे. या सीएसबी बॅंकेच्या नव्या शाखेत सर्व प्रकारच्या ठेवी व सोनेतारण कर्ज अशा सुविधा त्वरीत मिळणार आहेत.

२०२० -२१ या आर्थिक वर्षात देशभरात १००  हून अधिक शाखा उघडण्याची योजना सीएसबी बॅंकेने या वर्षाच्या सुरुवातीस जाहीर केली होती. सोनेतारण कर्ज देण्याचा सीएसबी बँकेचा मूळ व्यवसाय वार्षिक ४७ टक्क्यांनी वाढत आहे. सोनेतारण कर्जांच्या मागणीत होत असलेला स्पष्ट बदल लक्षात घेत, या बॅंकेने एकूण कर्जवितरणात सोनेतारण कर्जांचे प्रमाण एक तृतियांश इतके राखले आहे.  

विस्तार योजनेबाबत बोलताना सीएसबी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सी. व्ही. आर. राजेंद्रन म्हणाले, शंभर वर्षांची परंपरा असलेली सीएसबी बॅंक आपल्या ग्राहकांना व्यक्तिगत सेवा देण्याबद्दल व उत्तम भांडवल राखून असण्याबद्दल नावाजलेली आहे. नव्या शाखा उघडल्याने, कासा व सोनेतारण कर्जाच्या व्यवसायाव्यतिरिक्त, एमएसएमई क्षेत्राला व कृषी उद्योगाला वित्तपुरवठा करण्याच्या नव्या संधी आम्हाला मिळू शकतील. केरळ राज्याबाहेर देशात, विशेषतः पश्चिम व दक्षिणेकडील भागांत व्यवसाय वाढविण्याचे आमचे ध्येय आहे.

सध्या १८ राज्ये व २ केंद्रशासित प्रदेशांत या बॅंकेच्या ४३२ शाखा व ३१० एटीएम कार्यान्वित आहेत. नव्या शाखेमध्ये कृषी, एसएमई, कॉर्पोरेट व एनआरआय बॅंकिंग अशा अनेक सुविधा व सेवा उपलब्ध असणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading