यंदाच्या दिवाळीत कॅडबरी सेलिब्रेशन्सची ‘सर्वात दिलदार जाहिरात’
ही दिवाळी आजवरची सगळ्यात गोड दिवाळी म्हणून साजरी व्हावी म्हणून भारतातील काही आयकॉनिक स्नॅकिंग ब्रॅण्ड्सचे ‘मेकर्स आणि बेकर्स’ अशी ओळख असलेल्या माँडेलीझ इंडिया आपल्या कॅडबरी सेलिब्रेशन्सच्या साथीने तसेच इस दिवाली आप #KiseKhushKarenge?’ या नव्या जाहिरात मोहिमेच्या साथीने सणाचे हे दिवस पुन्हा एकदा उजळवून टाकण्यासाठी सिद्ध झाली आहे. याखेरीज आपल्या खास ई-कॉमर्स मंचांवर उपलब्ध असलेल्या प्रिमियम पॅक, ओरिओ मोमेन्ट्स आणि कॅडबरी कोकोच्या #TheSweetestDiwali उत्पादनांच्या साथीने कंपनीकडून सणाच्या झगमगाटात अधिकच भर टाकली जाणार आहे.
या प्रयत्नांविषयी बोलताना माँडेलीझ इंडियाच्या मार्केटिंग (चॉकलेट्स) इनसाइट्स अँड अॅनालिटिक्स विभागाचे सीनिअर डायरेक्टर अनिल विश्वनाथन म्हणाले, ‘’सणासुदीच्या संपूर्ण काळात भेटवस्तू आणि मिष्टान्नांची देवाणघेवाण करण्याला एक मोठे लक्षणीय असे भावनिक मोल असले. त्यातून एका नव्या पर्वाच्या आरंभाचे संकेत मिळतात आणि या लहानशा पण अत्यंत महत्त्वाच्या परंपरेमध्ये नम्रतेने सहभागी होत आम्ही इथे आमची एक जागा तयार केली आहे या गोष्टीचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे. आणि यावर्षी तर अपूर्णतेने भरलेल्या या जगामध्ये नव्या सुरुवातीची आणि चांगुलपणाच्या संभावनांची चाहूल देणा-या कृतींची कधी नव्हे इतकी गरज जाणवत आहे आणि आमची नवी कॅडबरी सेलिब्रेशन्स जाहिरात उदारतेच्या भावनेला जागं करताना हाच विचार मांडत आहे. ‘इस दिवाली आप #KiseKhushKarenge’, या विचाराच्या आधारे कठीण काळात आपली मदत करणा-या लोकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दिशेने योग्य पाऊल उचलण्यासाठी लोकांना प्रेरित करण्याच्या हेतूने आम्ही आमचे सर्वोत्तम योगदान देत आहोत. एखाद्या खास प्रसंगामध्ये ‘मिठास’ गुंफणे असो किंवा एखाद्या उत्साहाने भारलेल्या सणाला जल्लोषाची झळाळी देणे असो, सर्वांची लाडकी अशी आमची स्नॅकिंग उत्पादने या सर्व सोहळ्यांचा अविभाज्य भाग बनली आहेत आणि म्हणूनच यावर्षी आमच्या ग्राहकांना निवडीसाठी अधिक पर्याय देण्यासाठी आमच्या ई-कॉमर्स मंचावर उपलब्ध प्रिमियम उत्पादनांच्या श्रेणीचा विस्तार करत तसेच चॉकलेट्सव्यतिरिक्तही आमच्या इतरही सर्व ब्रॅण्ड्ससाठी आकर्षक उपक्रम घेऊन येत आम्ही आमच्या प्रयत्नांमध्ये आणखी भर टाकत आहोत.”
‘’कुछ अच्छा हो जाये, कुछ मीठा हो जाये‘’ या वाक्याने तयार केलेल्या परंपरेला आणखी पुढे नेत माँडेलीझ इंडियाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे आणि २६० हून अधिक पिनकोड पत्त्यांवरील १८०० हून अधिक रिटेलर्सपर्यंत पोहोचत, कॅडबरी सेलिब्रेशन्सच्या नव्याको-या जाहिरातीतून ‘’इस दिवाली आप #KiseKhushKarenge?” असा स्नेहपूर्ण प्रश्न विचारत आजवरची सर्वात दिलदार जाहिरात मोहीम तयार केली आहे. तंत्रज्ञान आणि एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत या कंपनीने अति-व्यक्तिगत (हायपर-पर्सनलाझज्ड) अशा जाहिरातीचा भारतातील पहिला प्रयोग साकारला आहे. या जाहिरातीदरम्यान मुंबई, दिल्ली, पुणे, इंदौर, अहमदाबाद आणि लखनऊमधील विशिष्ट पिनकोड पत्त्यांवरील या रिटेलर्सची नावे विशिष्ट उत्पादनांच्या गटाच्या साथीने झळकणार आहेत. दिवाळीचा आनंद साजरा करणा-या एका भारतीय कुटुंबातील स्त्री तिने स्थानिक दुकानांतून विकत आणलेल्या काही-ना-काही भेटवस्तू आपल्या कुटुंबियांना देत आहे असा प्रसंग मांडणा-या या जाहिरातीमध्ये हा संदेश अतिशय सुंदरपणे चित्रित करण्यात आला आहे. ‘’आपण सारे जेव्हा स्थानिक दुकानांना आधाराचा हात देऊ तेव्हा आपल्या सा-यांचीच दिवाळी आनंदमय होऊन जाईल‘’ या उत्सवाची भावना जागवणा-या व त्याचवेळी विचार करायला लावणारा संदेश देत आणि उदारतेच्या कृतीला प्रकाशझोतात आणत ही जाहिरात संपते.
