निखिल गजेंद्रगडकर यांना रा. अ. कुंभोजकर स्मृती पुरस्कार

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने प्रतिवर्षी सर्जनशील लेखन करणाऱ्या पत्रकारास किंवा ज्येष्ठ संपादकास लेखक व संपादक रा. अ. कुंभोजकर स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षीचा पुरस्कार दैनिक केसरीचे कार्यकारी संपादक निखिल गजेंद्रगडकर यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. शुक्रवार दि. ०६ नोव्हेंबर २०२० रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार निखिल गजेंद्रगडकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार यावेळी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती कार्यवाह उद्धव कानडे यांनी दिली.   

Leave a Reply

%d bloggers like this: