जैन कॉन्फरन्स तर्फे महा एक्सपोचे आयोजन

पुणे, दि. 30 – कोरोना महामारी यामुळे सर्वच व्यवसाय सध्या अडचणीत आहेत. व्यवसायासाठी अनेक डिजिटल माध्यमे वापरुन व्यवसाय केला जात आहे. जास्तीत -जास्त ऑनलाइन व्यवसायावर भर दिला जाता आहे. यासाठी अनेक नव – नवीन माध्यमे शोधली जात आहे. हाच विचार करून श्री ऑल इंडिया श्वेताम्बर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स तर्फे पहिल्या डिजिटल महा – एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दिनांक 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2020 दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.

या प्रदर्शनात संपूर्ण भारतातून जैन कॉन्फरन्सचे 100 हून व्यापारी आपले डिजिटल स्टॉल लावणार आहेत. सर्व व्यापऱ्यांना एक चांगले व्यासपीठ मिळणार आहे , असे व्यासपीठ जे संपूर्ण भारतभर पोहचणार असेल. हे प्रदर्शन फेसबुकच्या माध्यमांतून घेणार येणार असून https://www.facebook.com/Jain-Conference-All-India-Expo-111101830770672 या पेजवर तुम्हाला हे प्रदर्शन मोफत पाहता येणार आहे. संपूर्ण भारतातील अनेक राज्यातील वेगवेगळे व्यापारी आपले उत्पादन या माध्यमांतून मांडणार आहेत. या प्रदर्शनात जैन विमेन्स क्लब हा फेसबुक वरील महिलांचा ग्रुप देखील सहभागी होणार आहे. आपण हे प्रदर्शन फेसबुकवर पाहू शकता. यासाठी तुम्हाला फेसबुकच्या सर्चमध्ये जाऊन Jain Conference All-India Expo हे पेज सर्च करायचेआहे. तुम्ही हे पेज लाइक केल्यानंतर तुम्ही हे प्रदर्शन अगदी मोफत पाहू शकता. या पेजवरती तुम्हाला सर्व विक्रेत्याचे स्टॉल दिसतील. तुम्हाला जी वस्तु आवडतेल त्या सेलरचा फोन नंबर त्या आयडीवर दिलेला असेल त्यावर तुम्ही संपर्क करून खरेदी करू शकता. हे प्रदर्शन संपूर्णपणे मोफत असून अधिक – अधिक ग्राहक व व्यापारी यांनी यामध्ये घरबसल्या सहभागी व्हावे असे आवाहान श्री ऑल इंडिया श्वेताम्बर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स संपूर्ण भारत महिला विंगच्या अध्यक्षा विमल बाफणा यांनी केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: