शिक्षण प्रसारक मंडळींच्या नारळकर इन्स्टिट्यूट मध्ये MBA अभ्यासक्रम सुरू

पुणे, दि–22 – शिक्षण प्रसारक मंडळींची प्री एन जी नारळकर इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट अँड रिसर्च या संस्थेत यंदाच्या शैक्षणिक वर्षपासून विध्यार्थ्यांसाठी एम बी ए अभ्यासक्रमास सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षण प्रसारक मंडळींचे अध्यक्ष सदानंद उर्फ नंदू फडके, शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष एस के जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, विश्वस्त मिहीर प्रभुदेसाई व नारळकर इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ महेश अबाळे यांनी आज गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

यंदाच्या वर्षी एम बी ए अभ्यासक्रमकरिता मार्केटिंग, फायनान्स, एच आर, बिझनेस aanyalitcs, ऑपरेशन्स ऍण्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट, रुरल ऍण्ड ऍग्री बिजनेस मॅनेजमेंट, फार्मा हेल्थ केअर मॅनेजमेंट व टुरिजम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट या विषयांसाठी एकूण 120 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे नारळकर इन्स्टिट्यूट हीं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी सलग्न असून येथे व्यवस्थापन शास्त्र शाखेतील पदव्युत्तर पदवीका व पदवी अभ्यासक्रम चालविले जातात यंदाच्या शैक्षणिक वर्ष 2020–21 पासून संस्थेला एआयसिटीइ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त एम बी ए (120 प्रवेश क्षमता) हा अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता मिळाली आहे.

भविष्यात एस पी कॉलेजच्या आवरा मध्ये नारळकर इन्स्टिट्यूट चे भव्य अत्याधुनिक संकुल उभारण्याचा संस्थेचा मानस आहे या संकुलात अत्याधुनिक कॉमर्स एज्युकेशन ल हब निर्माण करून इंडस्ट्रीजकरिता पूरक आवश्यक असणारे डिप्लोमा ते डिग्री प्रोग्राम सचा समावेश या विविध कोर्सेस च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न राहणार आहे, त्याचबरोबर इतर मॅनेजमेंट स्कूल नारळकर संस्थेशी जोडण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे मुंबई येथील वेलींगकर मॅनेजमेंट स्कूल च्या फकॅलटी नारळकर संस्थेशी जोडल्या जाणार आहेत जगातील विविध इंटरनॅशनल संस्थांशी वेगवेगळ्या अभ्यासक्रमविषयी सामंजस्य करार केला जाणार आहे संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी प्लेसमेंट सेलचाही उपयोग केला जाणार आहे या सर्व सुविधा कॉमर्स एज्युकेशनल हब अंतर्गत नारळकर इन्स्टिट्यूट व सोलापूर येथील मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट या संस्थांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: