Saturday, June 13, 2026
PUNE

आझम कॅम्पसमध्ये पैगंबर जयंती साधेपणाने साजरी

पुणे : कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पैगंबर जयंती शासकीय नियम पाळून साधेपणाने साजरी केली गेली . हजरत महंमद पैगंबर जयंती (ईद – ए – मिलाद) निमित्त महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी ( आझम कॅम्पस )तर्फे मागील १६ वर्षांपासून काढण्यात येणारी अभिवादन मिरवणूक या वर्षी कोविड विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे.त्याऐवजी ५० जणांच्या उपस्थितीत कॅम्पस मधील असेम्ब्ली हॉल मध्ये ३० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता साधेपणाने जयंती साजरी केली गेली.

कुराणमधील संदेशाचे पठण करण्यात आले.कोरोना पासून जगाचे संरक्षण करण्यासाठी दुआ मागण्यात आली.डॉ.पी. ए. इनामदार अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे सचिव डॉ. लतीफ मगदूम , शिक्षक, प्राद्यापक वर्ग उपस्थित होता.

प्रेषित महमद पैगंबर यांच्या मानवतावादी, शिक्षण विषयक, पर्यावरणविषयक शिकवणुकीचे संदेश देण्यासाठी १६ वर्षांपासून या अभिवादन मिरवणुकीचे आयोजन केले जात होते . या वर्षी ही मिरवणूक रद्द करण्यात आली.

संस्थेतर्फे दरवर्षी छ. शिवाजी महाराज, महात्मा गांधी, म.फुले, डॉ.आंबेडकर तसेच प्रेषित महमद पैगंबर या महामानवांना अभिवादन करण्यासाठी अभिवादन मिरवणुका काढल्या जातात. आणि मानवतावादी संदेश दिले जातात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading