ऊसतोडणी कामगारांसाठी बोर्ड तयार करा, प्रकाश आंबेडकर यांची मागणी


बीड, दि. 25 – वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बीड जिल्ह्यात भगवान गडाच्या पायथ्याशी ऊसतोड कामगार, वाहतूकदार, बैलगाडी चालक व मुकादम यांच्या कामगार संघटनांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी , माथाडी कामगाराप्रमाणे ऊसतोडणी बोर्ड तयार करा, त्यासाठी विधानसभेत कायदा करा, जोपर्यंत नवा करारनामा होत नाही तोपर्यंत एकही ऊसतोड कामगार गाडीत बसणार नाही, आणखी काही दिवस कारखानदारांचं नाक दाबून ठेवा. तुमच्या मागण्या मान्य केल्यावाचून ऊस कारखानदारांना पर्याय नाही असे प्रतिपादन केले. भगवानगडाच्या पायथ्याशी ऊसतोड कामगार एकत्र आले आहेत . ‘भगवानगड ही क्रांती भूमी असून हा लढा नवा नाही. ‘ऊसतोड कामगारांचा वापर करून घेतला जातो’ ऊसतोड मजुरांचे शोषण केले जाते ते थांबले पाहिजे. कारखान्याने ऊस तोडणीच्या काळात त्यांच्यासाठी घरे उपलब्ध करून द्यावीत. जोपर्यंत सर्व न्याय्य मागण्या मान्य होईपर्यंत लढा चालूच राहील, असेही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: