IPL 2020 – राजस्थानचा मुंबईवर 8 विकेट्सने शानदार विजय

रविवारी झालेल्या दुसऱ्या लढतीत राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 8 विकेट्स राखून पराभव केला. मुंबईने विजयासाठी दिलेले 1976 धावांचे आव्हान राजस्थानने 2 गड्यांच्या मोबदल्यात 10 चेंडू बाकी असताना पार केले.

राजस्थानचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने 60 चेंडूत 14 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 107 धावा चोपल्या. संजू सॅमसनने 31 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकार ठोकत 54 धावा केल्या. स्मिथने 11 आणि रॉबिन उथप्पाने 13 धावांचे योगदान दिले.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 20 षटकात 5 बाद 195 धावा चोपल्या. हार्दिक पांड्याने वादळी खेळी करत 21 चेंडूत 7 षटकारांच्या मदतीने नाबाद 60 धावा केल्या.

पांड्यासह सूर्यकुमार यादवने 40, ईशान किशनने 37 आणि सौरभ तिवारीने 34 धावांचे योगदान दिले. राजस्थानचा वेगवान गोलंदाज 4 षटकात 60 धावांची लयलूट करण्यात आली.

Leave a Reply

%d bloggers like this: