IPL 2020 – केकेआर कडून पंजाबचा 2 धावांनी पराभव

अबुधाबी – आयपीएलच्या 24 व्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब फक्त 2 रनने पराभव झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने विजय खेचून आणला. सामन्यात केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने 20 ओव्हरमध्ये 6 गडी गमावून 164 धावा केल्या. विजयासाठी पंजाबला 165 धावांची गरज आहे. केकेआरसाठी युवा खेळाडू शुभमन गिलने 57 तर कर्णधार दिनेश कार्तिकने 58 रनची चांगली खेळी केली.

लक्ष्याचा पाठलाग करताना किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने 13 ओव्हरमध्ये कोणतीही विकेट न गमवता 106 धावा केल्या होत्या. मयंक अग्रवाल 36 बॉलमध्ये 56 रनची आक्रमक खेळी खेळली. तर 58 बॉलमध्ये 74 रनची खेळी केली. चांगली सुरुवात करुनही पंजाबला पराभवाचा सामना करावा लागला. किंग्ज इलेव्हन पंजाबने सलग 4 था सामना गमावला. किंग्ज इलेव्हन पंजाबने आतापर्यंत फक्त एक सामना जिंकला आहे.

फॉर्मात असलेला फलंदाज मयंक अग्रवालने केकेआरच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी केली. 33 चेंडूत त्याने अर्धशतक ठोकले. कर्णधार केएल राहुलने पंजाबला शानदार सुरुवात दिली. त्याने देखील 42 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. केएल राहुलचे या मोसमातील हे तिसरे अर्धशतक आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाबने पॉवरप्लेमध्ये चांगली सुरुवात केली. पंजाबने 6 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमवता 47 धावा केल्या. पंजाबने 10 ओव्हरनंतर एकही विकेट न गमवता 76 रन केले. पण शेवटी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमवून पंजाबला 162 धावाच करता आल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: