एक राजा बिनडोक आहे! उदयनराजेंचे नाव न घेता प्रकाश आंबेडकरांची टीका

मराठा आरक्षण मोर्चाला वंचित चा पाठिंबा

पुणे, दि. 8 – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता ‘एक राजा बिनडोक आहे’ अशा शब्दात टीका केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात येणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चाला पाठिंबा द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीकडे करण्यात आली होती. ही मागणी वंचित ने मान्य केली आहे. हे जाहीर करण्यासाठी पुण्यात पत्रकार परिषद बोलावली होती. यामध्ये बोलत असताना प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजे भोसले यांचा समाचार घेतला.

उदयनराजे भोसले यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की “ज्या माणसाला घटना माहिती नाही. आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर सगळ्यांचे आरक्षण रद्द करा अशी भूमिका घेणाऱ्याला भाजपने राज्यसभेत कसं काय पाठवलं? हा प्रश्न पडतो.” प्रकाश आंबेडकर यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबतही काहीसा नाराजीचा सूर लावलेला या पत्रकार परिषदेत पाहायला मिळाला. ‘दुसरे म्हणजेच संभाजीराजे यांनी भूमिका घेतली आहे हे खरं आहे मात्र ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर अधिक भर देत असल्याचं दिसतंय.’ असं आंबेडकर म्हणाले. मराठा आरक्षणाला आपण पाठिंबा दिला आहे, त्यामुळे बंदलाही आपण पाठिंबा दिला पाहिजे अशी भूमिका आम्ही जाहीर केली असल्याचे आंबेडकरांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: