कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीचा सुरेश ग्यान विहार युनिव्हर्सिटीशी सहकार्य  करार 

पुणे : शैक्षणिक आदानप्रदान ,संशोधन आणि शैक्षणिक सुविधांसाठी कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा  सुरेश ग्यान विहार युनिव्हर्सिटी(जयपूर )शी सहकार्य  करार झाला आहे.कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीचे पुणे स्थित संस्थापक सदस्य राकेश मित्तल यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
  कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक सदस्य राकेश मित्तल आणि सुरेश ग्यान विहार युनिव्हर्सिटी(जयपूर )चे संचालक  कनिष्क शर्मा यांनी या सहकार्य करारावर सह्या केल्या.  

 टोंगा देशातील कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीशी सहकार्य करार करणारे  सुरेश ग्यान विहार युनिव्हर्सिटी हे  ‘नॅक’ च्या वतीने ग्रेड ए  श्रेणीचे  एक्रिडिटेशन असणारे विद्यापीठ आहे. जयपूर परिसरात शैक्षणिक सुविधा केंद्र,अल्प मुदतीचे शैक्षणिक अभ्यासक्रम,विद्यार्थी -प्राध्यापक आदान प्रदान,पी एच डी संशोधन सुविधा,आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन,शैक्षणिक साधनांचे आदान प्रदान  अशा अनेक बाबतीत ही दोन्ही विद्यापीठे पुढाकार घेणार आहेत.    

राकेश मित्तल म्हणाले,’बदलत्या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यापीठे एकत्र येवून नवे उपक्रम,शैक्षणिक सुविधा देवू इच्छित आहेत. या सहकार्य करारानुसार  पी एच डी करु इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांना ६० ते ७२ तासांचे कोर्स वर्क सुरेश ग्यान विहार युनिव्हर्सिटी मध्ये पूर्ण करता येईल’. 

Leave a Reply

%d bloggers like this: