अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडा ने सादर केली ‘शुरुआत एसआयपी से’ ही नवीन मोहीम

पुणे, दि. 8 –  देशातील वेगाने विकसीत होणाऱ्या म्युच्युअल फंड पैकी एक असलेल्या अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडा ने गुंतवणूकदारांना एसआयपी चे महत्त्व सांगण्याच्या व शिक्षित करण्याच्या उद्देशाने शुरुआतएसआयपीसे या नावाची नवीन डिजिटल मोहीम सुरू केली आहे.

सध्याच्या साथीच्या रोगाने आपल्याला शिस्तबद्ध गुंतवणूकीचे महत्त्व शिकविले आहे. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत जोखीम घेण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात बदलली आहे आणि अशा परिस्थितीत आपला कष्टाने कमावलेला पैसा वाचवण्यासाठी आणि वाढविण्यासाठी एसआयपी हा एक आदर्श उपाय आहे. लवचिकता, शिस्तबद्ध दृष्टिकोन, रुपयाच्या किंमतीची सरासरी आणि चक्रवाढ पद्धतीने होणारी वाढ यांसारख्या अनेक फायद्यांमुळे गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओ मध्ये एसआयपी ला महत्त्वपूर्ण स्थान मिळाले आहे. गुंतवणूकदारांच्या आयुष्यातील कोणत्याही टप्प्यावर, सुरक्षित गुंतवणूकीचा पोर्टफोलिओ फार महत्त्वाचा असतो, याची जाणीव त्यांना करुन देण्याचे अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाच्या शुरुआतएसआयपीसे या नवीन डिजिटल मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

अ‍ॅक्सिस एएमसी चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रेश कुमार निगम म्हणाले प्रत्येक नव्या उद्दिष्टापर्यंतचा प्रवास हा योग्य दिशेने पहिले पाऊल टाकून सुरू होतो. त्याचप्रमाणे, आर्थिक समृद्धीसाठी आपल्याला जबाबदार गुंतवणूक करण्याकडे जाणे आवश्यक आहे. हे पाऊल फार मोठे असण्याचीही गरज नाही. आपण आरामात करू शकतो, इतके हे गुंतवणुकीचे पाऊल लहान असू शकते. गुंतवणूकीस प्रारंभ करणे, तिच्यावर लक्ष केंद्रित करणे आणि शिस्तबद्ध व पद्धतशीर दृष्टिकोन स्वीकारणे, हे फार महत्त्वाचे आहे. शुरुआतएसआयपीसे या मोहिमेद्वारे गुंतवणूकदारांना एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूकीचा प्रवास सुरू करण्याचे महत्त्व समजेल, अशी आम्ही आशा करतो.

गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूकीचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडा ने भरपूर वैशिष्ट्ये असलेले आपले मोबाईल अ‍ॅप्लिकेशन पुन्हा सुरू केले आहे. या अ‍ॅप च्या कार्ट मध्ये गुंतवणुकीचे विविध प्रकार अ‍ॅड करता येतात आणि चेकिंग आऊट करून नंतर ते पूर्ण करता येतात. तसेच गुंतवणुकीच्या योजनांची अदलाबदलही यातून सहजपणे करता येते. हे अ‍ॅप बाजारपेठेतील सर्वात नवीन अ‍ॅप्स पैकी एक आहे. याव्यतिरिक्त, यूपीआय मार्फत गुंतवणूक करणे, नवीन गुंतवणूक करण्याची आणि टॉप अप ची सहजतेने उपलब्धता, अद्ययावत एनएव्ही पाहणे आणि खाते विवरण वाचता येणे या गोष्टीही या अ‍ॅपमधून करता येतात.

Leave a Reply

%d bloggers like this: