1 हजारपेक्षा अधिक कोविड रुग्णांवर यशस्वी उपचार; मायमर मेडिकल कॉलेज व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयाचे कार्य कौतुकास्पद 


पुणे, दि. 8 – मावळ तालुक्यातील एकमेव कोविड समर्पीत रूग्णालय ‘मायमर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयातील’ डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी येथील एक हजार पेक्षा अधिक कोविड रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना बरे केले आहे.
 या संदर्भात मायमर वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे म्हणाल्या की, रुग्णालयात मध्यम ते अति तीव्र स्वरूपातील कोविड रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा आहे. येथे 365 सुसज्ज बेड असून त्यातील 148 बेड हे ऑक्सिजन, 16 व्हेंटिलेटर आणि अतिदक्षतेसाठी  20 बेड आहेत. तसेच, गर्भवती कोविड रूग्ण महिंलांसाठी प्रसूतिची सोय व स्वतंत्र ऑपरेशन थिएटर्सची सुविधा करण्यात आली आहे. अशा रुग्णांना ऑक्सिजनची अधिक गरज भासते हे लक्षात ठेवून हॉस्पिटलने अद्यायावत लिक्विड ऑक्सिजन यंत्रणा कार्यान्वयित केली आहे. तसेच, येथील डॉक्टरांतर्फे रुग्णांच्या नातेवाईकांना उपलब्ध बेड व व्हेंटिलेटरची माहिती दिल्या जाते. याच प्रमाणे कोविड आजारातून बरे झालेल्या रुग्णांकरीता विशेष बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहे.
नॉन कोविड रुग्णांसाठी संपूर्ण वैद्यकीय सेवा, पात्र लाभार्थी रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व इतर रुग्णांसाठी माफक दरात डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी सेवा देतात. येथील सर्व कर्मचारी, नर्सेस व डॉक्टरतर्फे दिल्या जाणार्‍या सेवेबद्दल व्यवस्थापनाच्या वतीने कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड नागरे, वैद्यकीय संचालक डॉ. सुरेश घैसास व प्राचार्य डॉ. राजेंद्र प्रसाद गुप्ता यांनी कौतुक केले.
ग्रामीण  क्षेत्रातील रुग्ण मदतीसाठी 02114-308380/308423/8087099040 या नंबरवर संपर्क साधू शकतात.

Leave a Reply

%d bloggers like this: