टाटा टेक्नॉलॉजीज आणि जीकेएन ऑटोमोटिव्ह यांनी संयुक्त रीतीने ग्लोबल इ-मोबिलिटी सॉफ्टवेअर इंजिनीरिंग सेंटर ची स्थापना केली

जागतिक इंजिनीरिंग आणि उत्पादन विकास डिजिटल सेवा देणारी टाटा टेक्नॉलॉजीज आणि ड्राइवरलाईन प्रणाली आणि प्रगत ई-पॉवरट्रेन सेवा देणारी जगातील अग्रगण्य कंपनी जीकेएन ऑटोमोटिव्ह यांनी आज भारतातील बंगळुरू येथील ग्लोबल इ-मोबिलिटी सॉफ्टवेअर इंजिनीरिंग सेंटर ची घोषणा केली.

नवीन संशोधन केंद्र इलेक्ट्रिक वाहनाच्या संशोधनासाठी टाटा टेकनॉलॉजिज येथील इलेक्ट्रिक आणि एम्बइडेड सिस्टिम क्षमतेचा वापर करेल याशिवाय भारतातील संगणक अभियांत्रिकी यांचा साहाय्याने जीकेएन ऑटोमोटिव्ह ची नेक्स्ट जनरेशन ई-ड्राईव्ह विकसित करेल जी भविष्यातील ई-मोबिलिटी तंत्रज्ञानाला आकार देईल. २०२० च्या अखेरीस १०० हून अधिक जागतिक दर्जाचे संगणक अभियंते व सहाय्यक कर्मचारी यांची नियुक्ती करण्याची महत्त्वाकांक्षा आहे. जीकेएन ऑटोमोटिव्हच्या भविष्यातील प्रगत ई-पॉवरट्रेन क्षमता विकसित करण्यासाठी संगणक अभियंता यांची वेगवान भरती मोहीम आधीपासूनच कार्यरत आहे.

यावेळी बोलताना टाटा टेक्नॉलॉजीजचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी वॉरेन हॅरिस म्हणाले “टाटा टेक्नॉलॉजीज, ‘इंजीनियरिंग ए बेटर वर्ल्ड’ दृष्टी घेऊन जगातील आघाडीच्या कंपन्यांना डिझाइन आणि अभियांत्रिकी क्षमतेद्वारे उत्कृष्ट उत्पादन आणि अनुभूती करण्यास सक्षम करते. जीकेएन ऑटोमोटिव्हचे हे सहकार्य इलेक्ट्रिकल वाहनांच्या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देईल आणि आपल्याला एक प्रदूषण विरहित जग बनविण्यास मदत करेल.”

जीकेएन ऑटोमोटिव्हचे सीईओ  लियाम बटरवर्थ म्हणाले “जीकेएन ऑटोमोटिव्हसाठी हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. हे केंद्र तयार करण्यासाठी टाटा टेक्नॉलॉजीज बरोबर सहकार्य करणे आम्हाला भारतातील जागतिक दर्जाचे सॉफ्टवेअर अभियांत्रिकी कौशल्य आणि टाटा टेक्नॉलॉजीजच्या उत्पादन अभियांत्रिकी क्षमतांचा लाभ घेण्यासाठी सक्षम बनविण्यास महत्वपूर्ण आहे. आमच्या ई-ड्राइव्ह तंत्रज्ञानाने आम्हाला आधीपासूनच बाजारपेठेतील अग्रणी स्थान दिले आहे, परंतु हा उपक्रम आम्हाला तंत्रज्ञान क्षमता वाढविण्यास आणि सुधारित करण्यात मदत करेल.

१२,६५० चौरस फुट जागेवर उभारलेल्या या केंद्रा मध्ये डिझाईन स्टुडिओ, लॅब स्टेशन, मीटिंग आणि कॉन्फरन्स रूम आणि वेलनेस केंद्र आहे. कोविड-१९ या  देशभर पसरलेल्या महासंकटाने निर्माण केलेल्या अभूतपूर्व आव्हानांना न जुमानता, या केंद्राचे बांधकाम अवघ्या सहा महिन्यांत पूर्ण झाले. हे केंद्र टप्प्याटप्प्याने उघडेल आणि सर्व टाटा टेक्नॉलॉजीज सुविधांमध्ये सध्या अंमलात आणल्या जाणा स्वच्छता, सॅनिटायझेशन आणि सामाजिक अंतर पद्धतींचे अनुसरण करेल.

Leave a Reply

%d bloggers like this: