भारती विद्यापीठ आयएमईडी मधील ९ दिवसीय इंडक्शन प्रोग्रॅमला प्रारंभ
पुणे : भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ‘(आयएमईडी’) च्या बीबीए ,बीसीए अभ्यासक्रमाच्या २०२० या शैक्षणिक वर्षाच्या नव्या तुकडीतील विद्यार्थ्यांचा ९ दिवसीय इंडक्शन प्रोग्रॅमला १ ऑकटोबर रोजी प्रारंभ झाला.
‘रोजगार शोधणारे होवू नका,रोजगार देणारे उद्योजक व्हा’,असा यशाचा मंत्र संगणकशास्त्र अभ्यासक्रमाच्या नव्या तुकडीतील विद्यार्थ्यांना या इंडक्शन प्रोग्रॅम मधून देण्यात आला.
भारती विद्यापीठच्या ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ‘आयएमईडी’ च्या बीबीए ,बीसीए अभ्यासक्रमाच्या २०२० या शैक्षणिक वर्षाच्या नव्या तुकडीतील विद्यार्थ्यांचा इंडक्शन प्रोग्रॅम १ ते १० ऑकटोबर दरम्यान आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षाची ओळख करून देण्यात आली,अभ्यासक्रमाची उद्दिष्टे समजावून सांगण्यात आली. मांयक्रोसॉफ्ट मीट द्वारे हा इंडक्शन प्रोग्रॅम ऑन लाईन पार पडला.
‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ‘आयएमईडी’ चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी ‘रोजगार शोधणारे होवू नका,रोजगार निर्माण करणारे उद्योजक व्हा’,असा मंत्र व्यवस्थापनशास्त्र,संगणक शास्त्र विद्यार्थ्यांना या इंडक्शन प्रोग्रॅम मधून दिला .
९ दिवसीय इंडक्शन प्रोग्रॅम मधून डॉ पवन अगरवाल (मुंबई ),स्टीफन (टाटा कन्सल्टन्सी),डॉ जयंत ओक,तपन चौधरी ,आशिष बक्षी,वृंदा वाळिंबे यांनी नव्या तुकडीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बीबीए ,बीसीए या अभ्यासक्रमांचे २५१ विद्यार्थी उपस्थित होते . ‘आयएमईडी’ च्या पौड रस्ता येथील कॅम्पस मध्ये हा कार्यक्रम झाला.
डॉ रामचंद्र महाडिक,डॉ श्वेता जोगळेकर,प्रा.दीपक नवलगुंद,डॉ हेमा मिर्जी,डॉ स्वाती देसाई,डॉ श्रद्धा वेर्णेकर,डॉ सुचेता कांची,डॉ प्रमोद कदम यांनी संयोजन केले.