‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत आतापर्यंत 61 लाख 5 हजार 305 नागरिकांची तपासणी – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे, दि.2 :- कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीन 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिम राज्यभर राबविण्यात येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार पुणे जिल्हयात घरोघरी सर्वेक्षणावर भर देवून ही मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या सर्वेक्षणात आतापर्यंत 61 लाख 5 हजार 305 नागरिकांची तपासणी करण्यात आली असून 32 हजार 368 नागरिक कोरोना संशयित आढळून आले आहेत. यातील 28 हजार 300 नागरिक संदर्भित करण्यात आले असून 3 हजार 841 नागरिक कोरोना बाधित आढळून आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमे अंतर्गत पुणे महानगरपालिका क्षेत्रात 16 लाख 37 हजार 86 नागरिकांची, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 18 लाख 79 हजार 217 नागरिकांची तर ग्रामीण भागातील 25 लाख 89 हजार 2 अशा एकूण 61 लाख 5 हजार 305 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रात 7 हजार 60 संशयित नागरिक सापडले आहेत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात 2 हजार 400, ग्रामीण भागात 22 हजार 908 असे एकूण 32 हजार 368 एवढे कोरोना संशयित नागरिक सापडले आहेत. पुणे महानगरपालिका क्षेत्रात 6 हजार 984 नागरिक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 516 नागरिक तर पुणे ग्रामीण भागात 19 हजार 800 असे एकूण 28 हजार 300 नागरिक संदर्भित करण्यात आले आहेत. या मोहिमेंतर्गत केलेल्या सर्वेक्षणा दरम्यान पुणे महानगरपालिका क्षेत्रात 780 कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात 286, पुणे ग्रामीण भागात 2 हजार 775 असे एकूण 3 हजार 841 कोरोना बाधित नागरिक आढळून आले आहेत. जिल्हयातील ग्रामीण भागात एकूण 574 गावांचे सर्वेक्षण झाले असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: