Tuesday, June 16, 2026
PUNE

पुण्यात युवासेनेच्या पदाधिकाऱ्याचा कोयत्याने खून

पुणे, दि. १ – युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याचा कोयत्याने खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी पहाटे १ वाजेच्या दरम्यान हि घटना घडली आहे. दीपक विजय मारटकर (वय ३६) असे खून झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांचे ते चिरंजीव होते.
हाती आलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी पहाटे एकच्या सुमारास गवळी अळी शुक्रवारपेठ परिसरात घडली. पाच ते सहा हल्लेखोरांनी मारटकर यांच्यावर धारदार हत्याराने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या मारटकर यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता, पहाटे दोनच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच ते सहा हल्लेखोरांनी कोयता आणि चाकूने मारटकर यांच्यावर खुनी हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. रात्री जेवण करून दीपक बाहेर आले होते. दरम्यान आधीपासूनच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला.  डोके, पाठ आणि छातीवर सपासप वार करून हल्लेखोर मोटरसायकलवरून पसार झाल्याचे समजते. सर्व हल्लेखोरांनी मास्क लावला होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading