यंदा जागतिक पर्यटन दिनी जगभरातील पर्यटकांसमवेत स्वित्झर्लंड’चे 400 वर्ष जुने लव्ह अफेअर साजरे!

स्वित्झर्लंड हे प्रत्येक प्रवासप्रेमींच्या बकेट लिस्टमधील ड्रीम डेस्टीनेशन असते. येथील नयनरम्य दृश्ये, मोहक पर्वतरांगा आणि आकर्षक शहरांमुळे एक पर्यटन स्थळ म्हणून स्वित्झर्लंड अद्वितीय अनुभव देतो. इथली सुलभ स्वीस वाहतूक यंत्रणा उत्तमरितीने जोडलेली असल्याने प्रत्येक पर्यटकासाठी वरदान ठरते. स्वीस नागरिकांकडून इथे भेट देणाऱ्यांचे अगत्यशील स्वागत केले जाते. त्यांचा उबदार पाहुणचार आयुष्यभरासाठी संस्मरणीय ठरतो. आज स्वित्झर्लंडचे पर्यटन क्षेत्र सुस्थितीत दिसते आहे. कारण इतर कोणत्याही देशाला नसेल इतकी तत्पर पाहुणचाराची सवय स्वित्झर्लंडला आहे. यंदाच्या जागतिक पर्यटन दिनी, स्वित्झर्लंडच्या पर्यटनाच्या उत्पत्तीचा वेध घेणे सार्थ ठरेल.

18 व्या शतकात रोमँटीक चळवळीचे शिलेदार युरोपात येत असत. त्यांच्या वैयक्तिक इच्छा-आकांक्षांचा मागोवा घेत, नियमित कला-साहित्यात अनुभवाची भर घालण्याच्या अनुषंगाने युरोपात पर्यटकांचा वावर असे. कवी जीन-जॅकोस रोस्यु यांची “ला नॉवेले हेलोईस” (द न्यू ईलोईस) ही कविता जिनिव्हा लेकच्या मनोहर सौंदर्यावर आधारलेली आहे. या अद्भुतरम्य परिसराचा अनुभव घेण्यासाठी हजारो लोक या ठिकाणाला आजही भेट देतात. कालांतराने यश चोप्रा यांच्या सिनेमांमधून आणि अनेक बॉलिवूड गाण्यांमधून रोमान्स करणाऱ्या स्वित्झर्लंडचे दर्शन भारतीयांना देखील घडले.

19 व्या शतकात ब्रिटनमधील उच्चभ्रू तरुणांना डोंगररांगा साद घालू लागल्या. युवा पर्यटकांना वस्तीला राहता येईल म्हणून पहिले गेस्टहाऊस माउंट रिगी 1816 मध्ये सुरू झाले. माउंट फोलहॉर्न हे युरोपातील सर्वोच्च शिखरावर असलेले गेस्टहाऊस 1823 ला; 1835 मध्ये व्हेनगरनाल्प; ईगेरच्या उत्तरेकडे तोंड असलेले क्लेन शिंडेग्ग 1838 मध्ये आणि 1840 दरम्यान रोथोर्न (ब्रिएन्झ) उभे राहिले. अगदी आजही स्वित्झर्लंडमधील गिरीशिखरे पर्यटकांना खुणावत असतात. यापैकी काही जागा तर साहसी क्रीडा प्रकारांचे केंद्रबिंदू झाल्या आहेत.

वर्ष 1854–1865 दरम्यानचा काळ आल्प्स पर्वतरांगांमधील पर्यटनाचा सोनेरी काळ म्हणून ओळखला जातो.  या कालावधीत खानदानी श्रीमंत ब्रिटीशांमध्ये स्वीस आल्प्सच्या शिखरांना पादाक्रांत करण्याची चुरस रंगली. 19 व्या शतकाच्या मध्यावर स्वित्झर्लंडने राणी एलिझाबेथ यांचे स्वागत केले आणि पाच आठवड्यांच्या पर्यटन काळात त्यांची सरबराई केली. आल्प्स रांगेतील एखाद्या देशाने सम्राज्ञीची उठबस करण्याची ही पहिलीच वेळ होती. या सहलीची छाप केवळ राणीच्या मनोपपलावर उमटली नाही, तर स्वीस पर्यटन क्षेत्रावर ठसा उमटला. सध्या रिसॉर्ट गस्ताद हे भारतातील राजघराण्यांतील सदस्य आणि सैफ अली खान, करीना कपूर, अनुष्का शर्मा तसेच विराट कोहली यांच्या पसंतीस उतरले आहे!  

आल्प्स प्रदेशाला ‘उपचाराचे ठिकाण’ मानण्यात येते. फुप्फुसासंबंधी विकारांवर उपचार घेण्यासाठीची सर्वोत्तम जागा म्हणून स्वित्झर्लंड प्रसिद्ध आहे. सर्वोच्च ठिकाणी ताजी हवा रुग्णाला व्याधी-मुक्त करण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे आगामी काळात देशात हेल्थ टुरिझम बहरणार आहे. याठिकाणी नवीन हेल्थ रिसॉर्टमध्ये झऱ्याचे पाणी चाखणे, हायड्रोथेरपी आणि डोंगराची शुद्ध हवा अनुभवण्यासाठी पर्यटक येतात. अगदी आजही स्वित्झर्लंड सर्वोच्च वेलनेस डेस्टीनेशन मानले जाते. इथे जागतिक दर्जाच्या सुविधा असलेले सुंदर स्पा आहेत!

डोंगररांगांमधून विशेष कोच सर्विसची सोय असल्याने मोठ्या प्रमाणावर लोकांना शिखर गाठणे शक्य होते. 1800 च्या मध्यावर डोंगरांच्या उतरणीच्या भागात कॉग रेल्वेची स्थापना केली. स्वीस पर्यटनाला याचा मोठा फायदा झाला. स्वित्झर्लंडमधील पहिली कॉग रेल्वे 1871 मध्ये सुरू झाली. वित्झनाऊ ते माउंट रिगी असा या रेल्वेचा टप्पा होता. त्यानंतरच्या काळात अनेक पर्याय आले. आता हा भाग जगातील अतिशय व्यवस्थितपणे जोडलेला आणि दळणवळणाची सुविधा असलेला मानला जातो. याला स्वीस ट्रॅव्हल पास – या लोकप्रिय सेवेची जोड आहे. त्यामुळे स्वित्झर्लंडचा पर्यटन पर्याय निवडण्यासाठी भारतीय पर्यटकांना प्रोत्साहन मिळते. कारण स्वीस ट्रॅव्हल पास वापरण्यास सुलभ आहे. 

1912 दरम्यान जंगफ्रौजोच हे 3454 मीटर उंचीवरील सर्वोच्च ट्रेन स्टेशन आहे. कालांतराने 19 व्या शतकाच्या मध्यावर या भागात केवळ ट्रेनची ये-जा वाढली नाही, तर हॉटेल आणि गेस्टहाऊस यांची संख्या वाढली. या भागात पर्यटकांचा वाढता कल पाहून पर्वत प्रदेशात सेवा-सुविधांचा विस्तार होत राहिला. सध्या स्वित्झर्लंडची पॅनोरमा ट्रेनचा मार्ग हा जगातील सर्वात सुंदर रेल रूटपैकी एक आहे. देखण्या पर्वतराजींचे सौंदर्य टिपत, विसावलेली दरी-खोरी, गाव-खेडी नजरेत साठवत, सोबत आरसपानी तलाव आणि शुभ्र-निळ्या हिमशिखरांचा नजारा पाहण्याची मजा काही औरच आहे. बेरनिना एक्सप्रेस, ग्लेशियर एक्सप्रेस आणि तत्सम ट्रेन देशाचा वारसा आणि इतिहासाचा भाग आहेत.

स्वित्झर्लंड हे छोटेखानी, समृद्ध आणि शांततामय राष्ट्र मानले जाते. येथील पर्यटन भरभराटीला आल्याने आर्थिक कणा मजबूत आहे. इथे अनेक गोष्टी उपलब्ध आहेत – बर्फाच्छादित पर्वतरांगा, सुखावणारी लँडस्केप्स आणि    शुद्ध धबधब्यांसोबत समृद्ध संस्कृती, पारंपरीक अनुभव, साहसी क्रीडा पर्याय आणि विविधांगी आहारशास्त्र. 20 वे शतकाची आगेकूच सुरू असताना आल्प्समधील पर्यटन क्षेत्र हा राष्ट्रीय अर्थकारणामधील अनन्यसाधारण घटक ठरला. आता यशस्वी राष्ट्र ही स्वित्झर्लंडची ओळख आहे. येथील हिवाळी पर्यटन प्रचाराचा देशाच्या एकंदर महसुलात महत्त्वपूर्ण सहभाग आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: